नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी रायगडमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उद्या जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन
प्रतिनिधी अमुलकुमार जैन
रायगड / अलिबाग :- (आ. मा. टॉ. टे. न्यू) दि.०६ १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करण्यात यावी, या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उद्या, सोमवार, दि. ७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग येथे एकत्र येणार आहेत.शिव छत्रपती शिक्षक, शिक्षकेतर आणि मुख्याध्यापक संघटना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुपारी ३ वाजता जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देण्यात येणार आहे. या वेळी संघटनेचे पदाधिकारी, तालुका अध्यक्ष तसेच जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. सेवाकाळ पूर्ण केल्यानंतर
निवृत्तीनंतरचे आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षित भविष्य लक्षात घेता जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी कर्मचाऱ्यांची भूमिका आहे.
या मागणीला पाठिंबा देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रायगड जिल्हा सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघटनेचे सेक्रेटरी श्री.अजय पाटील यांनी केले आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













