नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रिक्षा परमिटच्या नावांतरासाठी साडेचार हजारांची लाच; आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात – आजचा महाराष्ट्र

रिक्षा परमिटच्या नावांतरासाठी साडेचार हजारांची लाच; आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात

प्रतिनिधी अमुलकुमार जैन

नवी मुंबई :- रिक्षा परमिट नावावर करण्यासाठी शासकीय शुल्काव्यतिरिक्त स्वतःसाठी आणि लोकसेवकाच्या नावाने ४ हजार ५०० रुपयांची लाच मागणाऱ्या आरटीओ एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. विलास गणपती सनगर (वय ६२, रा. नवीन पनवेल) असे ताब्यात घेण्यात आलेल्या खासगी आरटीओ एजंटचे नाव आहे.याप्रकरणी ३७ वर्षीय ड्रायव्हिंग स्कूल व्यावसायिकाने ११ ऑगस्ट २०२६ रोजी एसीबीकडे तक्रार केली होती. तक्रारदाराकडे रिक्षा परमिट नावावर करण्याचे अधिकारपत्र होते. यासाठी त्यांनी आरटीओ एजंट विलास सनगर यांची भेट घेऊन आवश्यक कागदपत्रे दाखविली आणि नावांतरासाठी लागणाऱ्या शुल्काची माहिती विचारली.त्यावेळी सनगर यांनी शासकीय शुल्क २५ हजार ७०० रुपये असून, त्याव्यतिरिक्त स्वतःसाठी आणि लोकसेवकाच्या नावाने ४ हजार ५०० रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.या तक्रारीची एसीबीने पडताळणी केली. ११ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईत सनगर यांनी तक्रारदाराकडे स्वतःसाठी तसेच लोकसेवकाच्या नावाने ४ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर १ सप्टेंबर २०२६ रोजी खारघर आरटीओ कार्यालयासमोरील रस्त्यावर सापळा रचण्यात आला. दुपारी १ वाजून ५६ मिनिटांनी पंचांसमक्ष सनगर यांनी तक्रारदाराकडून ४ हजार ५०० रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमातील कलम ७(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीला अटक करण्याची तजवीज करण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक निता भासेले यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आली. सापळा पथकात पोलिस हवालदार पठाण, महिला पोलिस हवालदार छाया बिंदे आणि पोलिस नाईक विशाल अहिरे यांचा समावेश होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]