नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , एक मॅजिक पेनचा छडा लागला; दुसऱ्या मॅजिक पेनचा छडा कधी लागणार? – आजचा महाराष्ट्र

एक मॅजिक पेनचा छडा लागला; दुसऱ्या मॅजिक पेनचा छडा कधी लागणार?

प्रतिनिधी

३७ वर्षांच्या सेवेनंतर हेड मुकादम भारत तांबे यांची धक्कादायक तक्रार; फैसल ताटली, जयवंत सोनावणे आणि भारत अलगुंडी यांच्या कार्यपद्धतीची स्वतंत्र चौकशीची मागणी

ठाणे / भिवंडी :- (आ. मा. टॉ. टे. न्यू ) दि.२९ भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कथित अनियमितता, हजेरी मस्टरमधील गैरप्रकार आणि कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनावरून पुन्हा एकदा प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तब्बल ३७ वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावणारे हेड मुकादम भारत गणपत तांबे यांनी थेट लोकायुक्त, जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त आणि महापालिका आयुक्तांकडे धाव घेत आरोग्य विभागातील कारभाराची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.तांबे यांच्या तक्रारीत सहाय्यक आयुक्त फैसल

ताटली, मुख्य आरोग्य अधिकारी जयवंत सोनावणे आणि प्रभारी आरोग्य निरीक्षक भारत अलगुंडी यांच्या कार्यपद्धतीची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील कथित ‘मॅजिक पेन’च्या खेळापासून अधिकाऱ्यांच्या भूमिकेपर्यंत अनेक प्रश्न आता ऐरणीवर आले आहेत.३७ वर्षांची सेवा; तरीही कामापासून दूर ठेवण्याचा आरोप भारत तांबे यांनी आपल्या स्मरणपत्रात आपण गेली ३७ वर्षे महापालिकेची प्रामाणिकपणे सेवा बजावत असून सेवाकाळात कोणतीही गंभीर तक्रार अथवा शिस्तभंगाची कारवाई झालेली नसल्याचे नमूद केले आहे.मात्र, सध्या आपल्याला जाणीवपूर्वक कामकाजापासून दूर ठेवले जात असून पदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल अशा प्रकारे वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.तक्रारीनुसार, प्रभारी आरोग्य निरीक्षक भारत अलगुंडी हे संबंधित अधिकाऱ्यांची पाठराखण करीत असून हेड मुकादम पदावर असतानाही तांबे यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जात नसल्याचा दावा करण्यात आला आहे.काम दुसऱ्यांकडे; चूक झाली की जबाबदारी तांबे यांच्यावर?तांबे यांच्या तक्रारीत आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्यांच्या अखत्यारीतील कामकाज त्रिसरण गंगावणे व राजेश जाधव यांच्याकडे सोपविले जात असून प्रत्यक्ष कामाचे नियोजन, कर्मचारी नियंत्रण आणि इतर जबाबदाऱ्या त्यांच्याकडे दिल्या जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे.मात्र, कामकाजात काही त्रुटी आढळल्यास त्याची जबाबदारी आपल्यावर टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप तांबे यांनी केला आहे.त्यामुळे त्रिसरण गंगावणे आणि राजेश जाधव यांना नेमके कोणते विशेष अधिकार देण्यात आले आहेत? त्यांच्या कामकाजाची जबाबदारी कोणाची? याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.फैसल ताटलींची पाठराखण नेमकी कशासाठी?या संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे सहाय्यक आयुक्त फैसल ताटली यांची भूमिका.तांबे यांच्या तक्रारीनुसार, आरोग्य विभागातील अनियमितता आणि अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप आहे.त्यामुळे आता सवाल उपस्थित होत आह भारत अलगुंडी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत असताना त्यांची पाठराखण का केली जात आहे? फैसल ताटली यांची भूमिका नेमकी काय आहे?तक्रारींची स्वतंत्र चौकशी करण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांना संरक्षण मिळत असल्याचा आरोप का निर्माण झाला? हे प्रश्न महापालिका प्रशासनाने स्पष्ट करणे गरजेचे आहे.मुख्य आरोग्य अधिकारी जयवंत सोनावणे यांची भूमिका काय? या प्रकरणात मुख्य आरोग्य अधिकारी जयवंत सोनावणे यांचे नावही तक्रारीत स्पष्टपणे आले आहे. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत करण्यात आलेल्या तक्रारींमुळे आपल्याविरुद्ध वातावरण निर्माण करण्यात आल्याचा संशय तांबे यांनी व्यक्त केला आहे.त्यामुळे केवळ अलगुंडी यांच्यापुरती चौकशी मर्यादित न ठेवता फैसल ताटली, जयवंत सोनावणे आणि भारत अलगुंडी या तिघांच्या कार्यपद्धतीची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.‘मॅजिक पेन’चा जुना अध्याय पुन्हा चर्चेत! भिवंडी महापालिकेच्या आरोग्य विभागात यापूर्वी ‘मॅजिक पेन’ प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती. अनुपस्थित कर्मचाऱ्यांना हजेरी मस्टरमध्ये उपस्थित दाखविण्याच्या कथित प्रकारात आरोग्य निरीक्षक संतोष जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याचे वृत्त समोर आले होते.एका ‘मॅजिक पेन’चा छडा लागला. कारवाई झाली. प्रकरण गाजले.मात्र, आता भारत तांबे यांच्या तक्रारीत भारत अलगुंडी यांच्या ताब्यात दोन स्वतंत्र हजेरी मस्टर असल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यापैकी एक प्रशासनाला दाखविण्यासाठी आणि दुसरा काही विशिष्ट व्यक्तींची उपस्थिती दाखविण्यासाठी वापरला जात असल्याची माहिती मिळाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.जर हा आरोप चुकीचा असेल तर प्रशासनाने मूळ मस्टर समोर आणून सत्य स्पष्ट करावे. आणि आरोपात तथ्य असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई का करू नये? एक मॅजिक पेनचा छडा लागला; दुसऱ्या मॅजिक पेनचा छडा कधी? हा प्रश्न आता केवळ भारत तांबे यांचा राहिलेला नाही. महापालिकेच्या जनतेच्या पैशाचा, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा आणि प्रशासनातील पारदर्शकतेचा हा प्रश्न आहे.प्रत्यक्ष कामावर नसलेल्या कर्मचाऱ्यांना उपस्थित दाखविले जात असेल, हजेरीमध्ये फेरफार होत असेल किंवा वेतन प्रक्रियेत अनियमितता होत असेल, तर त्याची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे.म्हणूनच भिवंडीकरांचा थेट सवाल “एक मॅजिक पेनचा छडा लागला; दुसऱ्या मॅजिक पेनचा छडा कधी लागणार?”हजेरी मस्टर जप्त करून तपासणीची मागणी भारत तांबे यांनी नवीन प्रशासकीय मुख्यालयातील सर्व हजेरी मस्टर, उपस्थिती रजिस्टर, ड्युटी चार्ट, वेतन अभिलेख आणि संबंधित कागदपत्रे जप्त करून तपासावीत, अशी मागणी केली आहे.तसेच कथित दुहेरी हजेरी मस्टर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर शिस्तभंगाची व कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.तांबे यांच्या तक्रारीने प्रशासनासमोर सात प्रश्न

१. दोन हजेरी मस्टर असल्याचा संशय खरा आहे का?

२. गैरहजर कर्मचाऱ्यांना उपस्थित दाखविण्यात आले का?

३. भारत अलगुंडी यांच्या कार्यकाळातील हजेरी नोंदींची स्वतंत्र चौकशी होणार का?

४. फैसल ताटली अलगुंडींची पाठराखण का करीत असल्याचा आरोप होत आहे?

५. मुख्य आरोग्य अधिकारी जयवंत सोनावणे यांच्या कार्यपद्धतीची चौकशी का होऊ नये?

६. त्रिसरण गंगावणे व राजेश जाधव यांना देण्यात आलेल्या विशेष अधिकारांची चौकशी होणार का?

७. आणि सर्वांत महत्त्वाचे—पहिल्या ‘मॅजिक पेन’नंतर दुसऱ्या ‘मॅजिक पेन’चा शोध कधी लागणार?

आरोप खरे की खोटे, पण चौकशी झालीच पाहिजे!भारत तांबे यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना आपली बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, आरोप खरे की खोटे हे मूळ शासकीय अभिलेख, हजेरी मस्टर, ड्युटी चार्ट आणि वेतन नोंदी तपासल्यानंतरच स्पष्ट होऊ शकते.त्यामुळे या प्रकरणाची चौकशी एखाद्या विभागातील अंतर्गत चौकशीपुरती मर्यादित न ठेवता स्वतंत्र समिती अथवा सक्षम तपास यंत्रणेमार्फत करून अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.३७ वर्षे सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्याने थेट लोकायुक्तापर्यंत धाव घेतली आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासन या तक्रारीकडे किती गांभीर्याने पाहते, फैसल ताटली, जयवंत सोनावणे आणि भारत अलगुंडी यांच्या भूमिकेची चौकशी होते का आणि कथित दुसऱ्या ‘मॅजिक पेन’चा छडा लागतो का, याकडे संपूर्ण भिवंडीचे लक्ष लागले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]