नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ काळाच्या पडद्याआड; शरीरसौष्ठवपटू सागर माळीचे वयाच्या ३८ व्या वर्षी निधन – आजचा महाराष्ट्र

मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ काळाच्या पडद्याआड; शरीरसौष्ठवपटू सागर माळीचे वयाच्या ३८ व्या वर्षी निधन

प्रतिनिधी सतीश पाटील

मुंबई :- मुंबईतील शरीरसौष्ठव विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू सागर माळी वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून तो मूत्रपिंडाच्या आजाराशी लढा देत होता. त्याची ही झुंज अपयशी ठरली. त्याच्या अचानक जाण्याने क्रीडा जगतात आणि विशेषतः मुंबईच्या शरीरसौष्ठव क्षेत्रात शोककळा पसरली आहे.मुंबई श्री’ ते ‘मिस्टर वर्ल्ड’पर्यंतचा दैदिप्यमान प्रवासपिळदार शरीरयष्टी, दणकट स्नायू आणि मंचावर उतरताच प्रेक्षकांना भुरळ घालणारा सागर माळी २०१३ मध्ये प्रतिष्ठेचा ‘मुंबई श्री’ किताब जिंकून प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याची धिप्पाड शरीरयष्टी पाहून चाहत्यांना जागतिक कीर्तीच्या रॉनी कोलमनची आठवण येत असे; त्यामुळेच त्याला ‘रॉनी’ हे टोपणनाव मिळाले. ‘मुंबई श्री’नंतर सागरने ‘महाराष्ट्र श्री’ आणि ‘भारत श्री’ स्पर्धांमध्येही आपल्या कामगिरीची छाप पाडली. २०१४ मध्ये मुंबईत पार पडलेल्या ‘मि. वर्ल्ड’ स्पर्धेत त्याने ८५ किलो वजनी गटात थेट चौथा क्रमांक पटकावत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली होती. २०२० मधील ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेत त्याने सुनीत जाधवला दिलेली कडवी झुंज शरीरसौष्ठवप्रेमींच्या आजही लक्षात आहे.

 कोरोनानंतर ब्रेक आणि दुर्दैवी शेवट

२०१९ पर्यंत स्पर्धा गाजवणारा सागर कोरोना काळानंतर काही काळ स्टेजपासून दूर राहिला. मात्र, ही विश्रांती कायमची ठरेल असे कोणालाही वाटले नव्हते. गेल्या दोन वर्षांपासून तो मूत्रपिंडाच्या गंभीर आजाराशी सामना करत होता. दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याने त्याच्यावर नियमित डायलिसिस सुरू होते. वर्षानुवर्षे मेहनत करून शरीर कमावणाऱ्या या खेळाडूला दुर्दैवाने स्वतःच्याच शरीरातील अवयवाशी ही जीवघेणी लढाई लढावी लागली. सागर माळीच्या पश्चात आई, वडील आणि पत्नी असा परिवार आहे. त्याचे कुटुंबीय सध्या परदेशात असल्याने, त्यांच्या आगमनानंतर रविवारी मुंबईतील मुलुंड येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]