नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , दहीहंडी स्पर्धा नव्हे, सण म्हणून साजरी करा; जखमी गोविंदा नागेश भोईर याचे कळकळीचे आवाहन…. – आजचा महाराष्ट्र

दहीहंडी स्पर्धा नव्हे, सण म्हणून साजरी करा; जखमी गोविंदा नागेश भोईर याचे कळकळीचे आवाहन….

प्रतिनिधी

ठाणे (भिवंडी) : दि.२१.(आ. मा. टॉ. टे. न्यू ) दहीहंडी उत्सवात सहभागी होताना वाढती स्पर्धा, उंचावणारे थर आणि जीवघेणी जोखीम यामुळे अनेक गोविंदांना गंभीर दुखापतींना सामोरे जावे लागते. याच वेदनेचा तब्बल १७ वर्षांचा अनुभव घेतलेले भिवंडीतील रहिवासी नागेश भोईर यांनी दहीहंडीप्रेमी आणि गोविंदा पथकांना भावनिक आवाहन केले आहे. “दहीहंडी हा सण म्हणून साजरा करा; स्पर्धा म्हणून साजरा करू नका,” असे त्यांनी दैनिक स्वराज्य तोरण च्या माध्यमातून कळकळीने म्हटले आहे.दहीहंडी उत्सवात २००९ मध्ये जखमी झाल्यानंतर नागेश भोईर यांच्यावर गेल्या १७

वर्षांपासून विविध उपचार सुरू आहेत. सध्या ते स्पेक्ट्रम हॉस्पिटल, अंजुरफाटा, भिवंडी येथे पुढील शस्त्रक्रियेसाठी दाखल झाले आहेत. वयाच्या ४१व्या वर्षातही उपचार आणि वेदनांचा हा प्रवास सुरूच असल्याने त्यांच्या आयुष्यातील मोठा काळ दवाखाने आणि उपचारांमध्ये गेला आहे.“माझ्यासारखा त्रास, वेदना आणि दु:ख इतर कोणत्याही गोविंदाच्या वाट्याला येऊ नये,” अशी भावना व्यक्त करत त्यांनी दहीहंडीचे स्वरूप पुन्हा एकदा पारंपरिक, आनंदी आणि सुरक्षित करण्याची विनंती केली आहे. “दहीहंडी हा सण म्हणून साजरा करावा, स्पर्धा म्हणून नव्हे,” असा संदेश त्यांनी दैनिक स्वराज्य तोरण च्या माध्यमातून समस्त गोविंद प्रेमींना केला आहे.नागेश भोईर यांनी दहीहंडी उत्सवातील वाढत्या व्यापारीकरणावर आणि राजकीय स्पर्धेवरही नाराजी व्यक्त केली. लाखो रुपयांचे आमिष, वाढत्या थरांची हंडी, वर्चस्व आणि लोकप्रियता सिद्ध करण्याची चढाओढ यामुळे दहीहंडीसारख्या पारंपरिक आणि आनंददायी सणाचे मूळ स्वरूप बदलत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. डीजे, नृत्य आणि वाढत्या दिखाव्यामुळे उत्सवाच्या पारंपरिक स्वरूपाला बाधा येत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.विशेष म्हणजे कालच २० ऑगस्ट २०२६ रोजी नागेश भोईर यांचा ४१वा वाढदिवस झाला. आयुष्यातील गेलेली वर्षे आणि उपचारांमध्ये गेलेला काळ परत येणार नसला, तरी आगामी काळात त्यांच्या शारीरिक व्याधी दूर होऊन त्यांचे आयुष्य पुन्हा आनंदी आणि पूर्ववत व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.“जिंदगी ना मिलेगी दोबारा” हा त्यांचा संदेश दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गोविंदा आणि आयोजकाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. त्यांच्या या तळमळीच्या आवाहनाचा विचार करून दहीहंडीतील जीवघेणी स्पर्धा टाळत, सुरक्षितता आणि आनंदाला प्राधान्य दिल्यास तीच नागेश भोईर यांना मिळालेली खरी शुभेच्छा ठरेल.“गणपती बाप्पा मोरया!” या जयघोषासह नागेश भोईर यांनी दिलेला हा संदेश यंदाच्या दहीहंडी उत्सवात सुरक्षिततेचा आणि संवेदनशीलतेचा नवा विचार रुजवणारा ठरावा, अशी अपेक्षा त्यांनी दैनिक स्वराज्य तोरण च्या माध्यमातून समस्त गोविंद प्रेमींनकडून व्यक्त केली जात आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]