वावी येथे ‘एक शाम साई के नाम’ भक्तिमय संगीत कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न!
प्रतिनिधी
शिर्डी :- (आ. मा. टॉ. टे. न्यू ) समाज कल्याण न्यास, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वावी नगरीत ‘एक शाम साई के नाम’ हा भक्तिमय संगीत कार्यक्रम सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी साई पालखी निवारा, वावी, शिर्डी येथे .मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.साईबाबांच्या भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात आदिशक्ती यल्लम्मा गायन पार्टी, नाशिक यांचे सादरीकरण झाले. कार्यक्रमात शाहीर बॉबी पाथरे, नाना वीर तसेच शाहीर अजय गायकवाड व ठाणे
जिल्ह्यातील प्रसिद्ध गायिका सौ.हर्षाली पाटील यांनी आपल्या गायन-कलेतून उपस्थित साईभक्तांचे मनसोक्त मनोरंजन केले.या कार्यक्रमाच्या आयोजनात समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष धर्मसेवक डॉ. सोन्या काशीनाथ पाटील यांचे मार्गदर्शन लाभले, कार्यक्रमाच्या निमित्ताने साईभक्तांना भक्तिसंगीताचा अनोखा अनुभव मिळाला. तसेच संचालक श्री. जे. के. पाटील, युवा अध्यक्ष श्री. प्रितेश सोन्या पाटील, प्रमोद पाटील (पालखी अध्यक्ष),रघुनाथ पाटील (पालखी उपाध्यक्ष) उपाध्यक्ष अनंत नांदुरकर..उपाध्यक्ष दीपक म्हस्के, यात्रा प्रमुख केके पाटील यांचीही उपस्थिती होती.साईभक्ती, संगीत आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुरेल संगम असलेल्या या कार्यक्रमास परिसरातील नागरिक व साईभक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.असे समाज कल्याण न्यास, महाराष्ट्र राज्याचे संचालक श्री.जे.के.पाटील यांनी सांगितले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













