नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस मुख्यालय मैदानावर रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते संपन्न होणार ध्वजारोहण – आजचा महाराष्ट्र

स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस मुख्यालय मैदानावर रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते संपन्न होणार ध्वजारोहण

प्रतिनिधी

रायगड (अलिबाग) दि.१३ (आ. मा. टॉ. टे. न्यू):-भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ शनिवार, दि.१५ ऑगस्ट २०२६ रोजी रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते अलिबाग पोलीस मुख्यालय मैदान येथे सकाळी ९.०५ वा.संपन्न होणार आहे.मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाचवेळी

होणार असल्याने सकाळी ८.३५ ते ९.३५ वाजता या वेळेत त्या दिवशी इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३५ वाजण्याच्यापूर्वी किंवा ९.३५ वाजल्याच्या नंतर आयोजित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. तरी नागरिकांनी, प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी या समारंभासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]