नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , समाज कल्याण न्यासच्या वतीने भिवंडी ते शिर्डी श्रावणी पालखी पदयात्रेला १३ ऑगस्ट पासून अंजूरफाटा येथून प्रारंभ…. – आजचा महाराष्ट्र

समाज कल्याण न्यासच्या वतीने भिवंडी ते शिर्डी श्रावणी पालखी पदयात्रेला १३ ऑगस्ट पासून अंजूरफाटा येथून प्रारंभ….

प्रतिनिधी

भिवंडी (आ. मा. टॉ. टे. न्यू.) :-  समाज कल्याण न्यासच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘श्रावणी पालखीसह पदयात्रा सोहळा-२०२६’ आयोजित करण्यात आला आहे. ‘पायी हळू हळू चला, मुखाने साईनाथ बोला’ या भक्तिमय संदेशासह आयोजित करण्यात आलेल्या या पदयात्रेचा मार्ग भिवंडी ते श्री क्षेत्र शिर्डी असा आहे.समाज कल्याण न्यासचे मुख्य कार्यालय, अंजूरफाटा, भिवंडी येथून गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७ वाजता पदयात्रेला सुरुवात होणार आहे. साईंच्या पालखीसमवेत निघणाऱ्या या पदयात्रेत भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, श्रद्धा व भक्तीच्या वातावरणात पालखी सोहळ्याची शोभा वाढविण्यात येणार आहे.यंदाची ही पदयात्रा समाज कल्याण न्यासच्या १९व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आली आहे. पदयात्रेच्या माध्यमातून साईभक्तीचा संदेश जनमानसात पोहोचविण्याबरोबरच सामाजिक बांधिलकीची भावना दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.या पदयात्रेनिमित्त सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता निमगाव-निमज येथील ठिकाणी साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमासही भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे संचालक श्री जयवंत काशिनाथ पाटील यांनी दैनिक स्वराज्य तोरण च्या माध्यमातून केले आहे.समाज कल्याण न्यासचे संस्थापक-अध्यक्ष धर्मसेवक डॉ. श्री. सोन्या काशीनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या पदयात्रा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेसाठी माजी आमदार श्री. रूपेश लक्ष्मण म्हात्रे (प्रदेश अध्यक्ष, समाज कल्याण न्यास महाराष्ट्र), श्री. जे. के. पाटील ( पालखी मुख्य संचालक), श्री. नारायण (मामा) पाटील (पालखी कार्याध्यक्ष), श्री. प्रमोद पाटील (पालखी अध्यक्ष), श्री. रघुनाथ पाटील (पालखी उपाध्यक्ष) आणि श्री. के. के. पाटील (यात्रा प्रमुख) यांचा प्रमुख सहभाग आहे.qसाईंच्या पालखीचे दर्शन व पदयात्रेचा भक्तिमय सोहळा अनुभवण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण न्यासच्या वतीने करण्यात आले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]