नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , दृष्टीहीनांचे एक अतिरिक्त ज्ञानेंद्रिय अधिक संवेदशील’ – आजचा महाराष्ट्र

दृष्टीहीनांचे एक अतिरिक्त ज्ञानेंद्रिय अधिक संवेदशील’

प्रतिनिधी

नवी मुंबई :- (आ. मा. टॉ. टे. न्यू) पाहण्याची शवती नसणाऱ्यांना आंधळे म्हणण्याऐवजी दृष्टीहीन म्हणायला हवे. त्यांच्या डोळे या इंद्रीयांची अक्षमता जरी असली तरी नियंत्याने त्यांच्यात एखादे अतिरिक्त ज्ञानेंद्रीय अधिक जागरुकतेने सक्रीय केलेले असते, संगीताची कला ते खूप चांगल्या रीतीने आत्मसात करतात असे प्रतिपादन विद्यानिकेतन संगीत विद्यालयाच्या संचालिका सुरेखा थिगळे यांनी केले. नवी मुंबईतील लेखक पत्रकार राजेंद्र घरत यांच्या ‘लेकुरे उदंड झाली’ या ब्रेल लिपीतील ३४ व्या पुस्तकाचे प्रकाशन

थिगळे यांच्या हस्ते देशमुख कृषी पर्यटन केंद्र, काराव येथे पार २७ जुलै रोजी पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या.याच कार्यक्रमात राजेंद्र घरत यांचे महाविद्यालयीन सोबती प्रा. एकनाथ जाधव यांच्या हस्ते ‘प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे आणि त्यांची भाषा’ या ब्रेल लिपीतील ३५व्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. निरपेक्षपणे पत्रकारिता करत सामाजिक कार्यातही व्यस्त राहुन राजेंद्र घरत हे समाजऋण फेडण्याचा विधायक प्रयत्न करत असल्याबद्दल प्रा. जाधव यांनी आनंद व्यक्त केला व अशीच अधिकाधिक पुस्तके प्रकाशित होत राहुन ज्ञानाचा प्रकाश सगळीकडे पसरो अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी डॉ. श्रध्दा सोमण, अध्यापिका विभावरी तरटे, शुभदा बोराडे हे घरत यांचे महाविद्यालयीन सोबती तसेच देशमुख कृषी पर्यटन केंद्राचे संचालक दिलीप देशमुख हेही उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]