नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिवनेरी स्वच्छता मोहिमेसह विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप; छत्रपती शिवबा प्रतिष्ठानचा सेवाभावी उपक्रम! – आजचा महाराष्ट्र

शिवनेरी स्वच्छता मोहिमेसह विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप; छत्रपती शिवबा प्रतिष्ठानचा सेवाभावी उपक्रम!

प्रतिनिधी

जुन्नर :- .दि. ३१ (आ. मा. टॉ. टे. न्यू.) छत्रपती शिवबा प्रतिष्ठान, भिवंडी यांच्या वतीने आयोजित ‘सेवा शिवनेरीची’ या उपक्रमांतर्गत शिवनेरी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच किल्ला परिसरासाठी कचरा कुंड्यांची भेट देण्यात आली. यानंतर जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, पाडली पाडा येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शाळेला पंखे व कचरा कुंड्यांचे वितरण करण्यात आले.या उपक्रमाला उद्योजक रवि शेठ खिलारी, शिवनेरी गडाचे माजी अध्यक्ष रुपेश जगताप तसेच

वात्सल्य फाउंडेशनचे अध्यक्ष व कीर्तनकार ह.भ.प. दर्शन महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली.कार्यक्रमाची सुरुवात शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर शिवजन्मस्थळाचे दर्शन घेत प्रतिष्ठानच्या सदस्यांनी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविली. मोहिमेदरम्यान संकलित कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली तसेच फॉरेस्ट कार्यालयाला कचरा कुंड्यांची भेट देण्यात आली.यानंतर जिल्हा परिषद शाळा, पाडली पाडा येथे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांनी हातात फुले घेऊन पाहुण्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोहर तरे यांनी केले, तर शाळेच्या मुख्याध्यापिकांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. संपूर्ण कार्यक्रम संस्थापक अध्यक्ष विजय भामरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.यावेळी रवि शेठ खिलारी, रुपेश जगताप आणि दिलीप नाईक यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, सामाजिक बांधिलकी आणि जीवनातील सकारात्मक मूल्यांविषयी मार्गदर्शन केले.प्रसंगी प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या, शैक्षणिक साहित्य, पेन, परीक्षा पॅड, पाण्याच्या बाटल्या, एअरटाईट जेवणाचे डबे, बिस्किटांचा खाऊ आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेला पंखे आणि कचरा कुंड्यांची भेट देण्यात आली.या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थापक अध्यक्ष विजय भामरे, सल्लागार दिलीप नाईक, मनोहर तरे व नरेश पाटील, खजिनदार रणजीत नाईक, सहखजिनदार निवृत्ती भोईर, सहसचिव राजकुमार व रोहीदास पाटील तसेच सदस्य दीपक माळी, प्रेमनाथ तरे, रविंद्र म्हात्रे आणि जितू म्हात्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवि शेठ खिलारी आणि रुपेश जगताप यांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल छत्रपती शिवबा प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]