धर्मसेवक डॉ. सोन्या काशीनाथ पाटील यांच्या पुढाकारातून कोल्हापूरच्या जागृत देवस्थानांचे दर्शन!
प्रतिनिधी
समाज कल्याण न्यासच्या कार्यकर्त्यांचे विशेष सहकार्य….
कोल्हापूर :- (आ. मा. टॉ. टे. न्यू )समाज कल्याण न्यास, महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष तथा धर्मसेवक डॉ. श्री. सोन्या काशीनाथ पाटील यांच्या पुढाकारामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध व जागृत देवस्थानांचे दर्शन घेण्याचा दुर्मिळ योग लाभल्याने उपस्थित डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील संपादक – दैनिक स्वराज्य तोरण यांनी समाधान व्यक्त केले.या धार्मिक दौऱ्यात आदमापूर येथील श्री बाळूमामा देवालय, करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर, कोल्हापूर तसेच वाडी रत्नागिरी येथील श्री ज्योतिबा मंदिर 
येथे अत्यंत भक्तिभावाने दर्शन घेण्यात आले. विशेष म्हणजे, मंदिरांच्या गाभाऱ्यात प्रवेश करून देवदर्शन घेण्याची संधी मिळाल्याने उपस्थित संपादकांनी हा क्षण आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव
असल्याचे सांगितले.या दर्शनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील समाज कल्याण न्यास, महाराष्ट्र राज्याचे कार्यकर्ते श्री. विकास पाटील (संस्थापक अध्यक्ष – राणादा युवा विकास फाउंडेशन, आदमापूर), श्री. विश्वास पाटील, श्री. बाबासो पाटील आणि श्री. सागर पाटील यांनी विशेष सहकार्य करून दर्शन व्यवस्था सुरळीत पार पाडली.या 
धार्मिक प्रवासात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कोळीगीत गायक व बिग बॉस फेम श्री. संतोष चौधरी (दादुस), डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील (संपादक – दैनिक स्वराज्य तोरण) तसेच श्री संत बाळूमामाचे भक्त श्री. विजय पाटील (नेवाळी) हे सहभागी झाले होते. सर्वांनी 
मंदिरांमध्ये पूजा-अर्चा करून कुटुंबाच्या सुख-समृद्धी व शांततेसाठी प्रार्थना केली.आदमापूरचे श्री बाळूमामा देवालय हे संत बाळूमामा 
यांच्या कार्यामुळे भक्तांचे श्रद्धास्थान मानले जाते. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर हे शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचे शक्तिस्थळ असून देशभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. तर वाडी 
रत्नागिरी येथील श्री ज्योतिबा मंदिर हे भगवान ज्योतिबांच्या भक्तांचे प्रमुख तीर्थक्षेत्र असून चैत्र यात्रेसह वर्षभर येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते.या संपूर्ण धार्मिक दर्शन यात्रेबद्दल उपस्थितांनी धर्मसेवक डॉ. श्री. सोन्या काशीनाथ पाटील यांचे 
मनःपूर्वक आभार मानले. त्यांच्या प्रयत्नांमुळे गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्याचे भाग्य लाभल्याची भावना व्यक्त करत, हा आध्यात्मिक अनुभव आयुष्यभर स्मरणात राहील, असे सर्वांनी सांगितले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













