खोपोलीत ‘रेडियन्स क्लिनिक’चा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साह पुर्ण वातावरणात संपन्न!
प्रतिनिधी
रायगड (खोपोली) :- (आ. मा. टॉ. टे. न्यू.) खोपोली शहरातील नागरिकांना नेत्र व त्वचारोगांसाठी अत्याधुनिक आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘रेडियन्स क्लिनिक – सुपरस्पेशालिटी आय अँड स्किन केअर’ या नव्या क्लिनिकचा उद्घाटन समारंभ बुधवार, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साह पुर्ण वातावरणात विविध मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला.शास्त्री नगर, खोपोली येथील बी. कल्याणजी कालिया, पहिला मजला येथे 
हा समारंभ पार पडला.या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुहास हल्दीपूरकर (मेडिकल डायरेक्टर, लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट आणि चॅरिटेबल ट्रस्ट), डॉ. राकेश बरोटे (प्राध्यापक व नेत्रविभाग प्रमुख, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, ठाणे), डॉ. रिटा घामणकर (कॅटरॅक्ट व ग्लुकोमा कन्सल्टंट, लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट आणि चॅरिटेबल ट्रस्ट), डॉ. दीपक कुलकर्णी (मेडिकल डायरेक्टर व प्रमुख डर्मेटोलॉजिस्ट, आलोक क्लिनिक, पनवेल), डॉ. ओजस कुलकर्णी (कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट व डर्मेटोसर्जन, आलोक क्लिनिक, पनवेल) तसेच डॉ. हता जोशी कुलकर्णी (कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट व डर्मेटोसर्जन, आलोक क्लिनिक, पनवेल) व श्री.गजानन महादेव कुंडे शितल गजानन कुंडे यांची खासउपस्थिती होती.रेडियन्स क्लिनिकच्या माध्यमातून नेत्ररोग तसेच त्वचारोग उपचारांसाठी आधुनिक सुविधा, तज्ज्ञ सल्ला आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्याची माहिती डॉ. प्रतीक गजानन कुंडे व डॉ. नेहा मुकुंद भगत यांनी दिली.या क्लिनिकचे प्रमुख डॉ. प्रतीक गजानन कुंडे (एमबीबीएस, डीएनबी, एफएफआईएच – नेत्ररोगतज्ज्ञ) आणि डॉ. नेहा मुकुंद भगत (एमबीबीएस, डीडीव्हीएल – त्वचारोगतज्ज्ञ) असून, समस्त कुंडे व भगत परिवाराच्या वतीने सर्व नागरिकांनी या उद्घाटन समारंभास उपस्थित राहून शुभाशीर्वाद दिले आहेत, तसेच खोपोली परिसरातील आरोग्यसेवेत या नव्या क्लिनिकमुळे निश्चितच मोठी भर पडणार असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













