नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , किल्ले रायगड पायथ्याशी ‘शिवपुण्यसप्ताह’ व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन – आजचा महाराष्ट्र

किल्ले रायगड पायथ्याशी ‘शिवपुण्यसप्ताह’ व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

प्रतिनिधी महेश स्वामी जंगम 

रायगड :- (आ.मा.टॉ.टे.न्यू.) किल्ले श्री रायगड पायथ्याशी (हिरकणीवाडी) येथे इतिहासात प्रथमच ‘शिवपुण्यसप्ताह’ तसेच अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन रायगड पुत्र आकाश महाराज भोंडवे यांच्या पुढाकारातून करण्यात येत आहे.या सप्ताहाची सुरुवात वैशाख शुद्ध ३, सोमवार दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी होणार असून समारोप वैशाख शुद्ध ८, शुक्रवार दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी

होणार आहे. सप्ताहाच्या कालावधीत विविध धार्मिक, ऐतिहासिक व संस्कारवर्धक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्ताने भव्य कीर्तन महोत्सव, शिवकालीन शस्त्र प्रशिक्षण तसेच भव्य बालसंस्कार शिबिर यांसारखे उपक्रम होणार आहेत. या कार्यक्रमामुळे शिवकालीन इतिहासाची माहिती आणि संस्कार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आयोजकांनी व्यक्त केला आहे.सप्ताहादरम्यान वारकरी संप्रदायातील भाविक, इतिहासप्रेमी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क : ९०३०२७४५२२ / ८८६९००६४९९.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]