आमदार रोहितदादा आर. आर. पाटील यांच्या हस्ते साहित्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल नवनाथ रणखांबे यांचा सन्मान
प्रतिनिधी
सांगली :- (आ.मा.टॉ.टे.न्यू.) तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील लोकप्रिय आमदार रोहितदादा आर. आर. पाटील यांच्या हस्ते, आर. आर. पाटील एज्युकेशन ट्रस्ट, मुंबई आयोजित विद्यार्थी शिष्यवृत्ती वितरण सोहळ्यात साहित्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल ट्रस्टच्या वतीने साहित्यिक नवनाथ आनंदा रणखांबे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मांजर्डे येथील बौद्ध विहारात त्यांना नुकतेच गौरवण्यात आले.या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत सीताराम 
रणखांबे, जि. प. सदस्य मोहन नाना पाटील, माजी सभापती कमलताई पाटील, सरपंच संध्याराणी मंडले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.साहित्य हे समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. आपल्या लेखणीतून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडत नवनाथ रणखांबे यांनी सामाजिक जाणिवा अधिक बळकट केल्या आहेत. त्यांची तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.रणखांबे यांना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून, ते विविध ऐतिहासिक बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे मानकरी आहेत. त्यांनी साहित्यसाधनेतून समाजजागृती, समता आणि मानवतावादी विचारांचा प्रभावी संदेश दिला आहे.साहित्य क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण, निष्ठावान आणि प्रेरणादायी कार्यामुळे समाजात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्यातून केवळ त्यांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध झालेले नाही, तर अनेकांना दिशा व प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













