नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , “डिजिटल जनगणने” साठी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका सज्ज! – आजचा महाराष्ट्र

“डिजिटल जनगणने” साठी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका सज्ज!

प्रतिनिधी

२८ फिल्ड ट्रेनर्सच्या प्रशिक्षणाने मोहीम सुरू….

ठाणे ( भिवंडी ) :- ( आ.मा.टॉ.टे.न्यू ) भारतीय जनगणना २०२७ च्या प्रक्रियेला भिवंडी निजामपूर शहर महानगर पालिका क्षेत्रात सुरुवात झाली असून महानगर पालिका प्रशासन यासाठी सज्ज झाले आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणाऱ्या या जनगणनेसाठी महानगर पालिका कार्यक्षेत्रात मा. आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी श्री. अनमोल सागर (भाप्रसे) व मा. अतिरिक्त आयुक्त श्री. विठ्ठल डाके यांच्या मार्गदर्शनाखाली सूक्ष्म आराखडा नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून दि. ६ एप्रिल २०२६ ते दि. ८ एप्रिल २०२६ या तीन दिवसांचे कालावधीत महानगरपालिका नवीन प्रशासकिय इमारतीतील आयुक्त यांच्या सभा दालनात 28 फिल्ड ट्रेनर्सच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला. मा. उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी श्री. विक्रम दराडे, मा. सहायक आयुक्त श्री. नितीन पाटील, जनगणना विभाग प्रमुख श्री. माणिक जाधव, समन्वय अधिकारी सुभाष पार्टे यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या प्रशिक्षण वर्गातून मास्टर्स ट्रेनर्स श्री. अजय ठाकूर, सहायक संचालक – जनगणना व प्रा. अजित भोईर यांनी मनपा क्षेत्रातील नियुक्त २८ जनगणना क्षेत्रीय प्रशिक्षकांना डिजिटल जनगणने बाबत टप्पा निहाय सविस्तर माहिती दिली. या मुलभूत प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक प्रगणक व पर्यवेक्षक यांचेपर्यंत डिजिटल जनगणना बाबत अचूक माहिती पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रशिक्षणात प्रामुख्याने जनगणना- २०२७ चा पहिला टप्पा असलेल्या घरयादी व घरगणनेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. डिजिटल स्वरूपामुळे यावेळी प्रगणकांना कागदी अर्जांऐवजी (CMMS) पोर्टल आणि एचएलबीसी (HLBC) ॲपचा वापर करावा लागणार आहे. या ॲपचे तांत्रिक ज्ञान, जनगणना कायदा व नियम आणि माहिती संकलनाची प्रक्रिया याबाबत या २८ फिल्ड ट्रेनर्सना हँड्स-ऑन ट्रेनिंग देण्यात आले. हे २८ प्रशिक्षित फिल्ड ट्रेनर्स पुढे २७ एप्रिल ते ८ मे, २०२६ या कालावधीत प्रधान जनगणना अधिकारी तथा आयुक्त, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका यांच्या अधिनस्त असलेल्या पाच चार्जमधील सुमारे १६५० प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षित करणार आहेत. विशेष म्हणजे, या आगामी जनगणनेत नागरिकांसाठी प्रथमच “स्व-गणना” म्हणजेच सेल्फ-इन्युमरेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत शासनाच्या अधिकृत वेबपोर्टलवर लॉगीन करून स्वतःची माहिती नोंदवावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत घरयादी आणि घरगणनेचा पहिला टप्पा राबविला जाणार आहे.(श्रीकांत परदेशी) जनसंपर्क अधिकारी

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]