नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भाजपा प्रदेश माध्यम प्रमुखपदी गोविंद येतयेकर यांची तर सह माध्यम प्रमुखपदी ओम प्रकाश चौहान – आजचा महाराष्ट्र

भाजपा प्रदेश माध्यम प्रमुखपदी गोविंद येतयेकर यांची तर सह माध्यम प्रमुखपदी ओम प्रकाश चौहान

प्रतिनिधी

मुंबई :- (आ.मा.टॉ.टे.न्यू )भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या माध्यम प्रमुख पदी श्रीगोविंद येतयेकर यांची तर सह माध्यम प्रमुख पदी ओम प्रकाश चौहान यांची नियुक्ती करण्यात आली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत श्री गोविंद

येतयेकर व श्री ओम प्रकाश चौहान यांना संघटनात्मक नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी रविंद्र चव्हाण यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस सुनील राणी भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.गोविंद येतयेकर हे एक पत्रकार आणि महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आहेत. यापूर्वी प्रबोधन गोरेगावच्या कार्यकारिणीत देखील सक्रिय होते. पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रात कार्य आहे. ओमप्रकाश चौहान हे भाजपाचे जुने कार्यकर्ते असून माध्यम विभागात अनेक वर्षापासून कार्यरत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपची माध्यम व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]