नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भरोडी गावची सुकन्या दिव्या पाटील मुंबई पोलीस दलात सामील! – आजचा महाराष्ट्र

भरोडी गावची सुकन्या दिव्या पाटील मुंबई पोलीस दलात सामील!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व ओम साई रिक्षा युनियन मानकोली- दापोडे यांच्या वतीने तिचा सन्मान!

ठाणे ( भिवंडी ) :- दि.७ (आ.मा.टॉ.टे.न्यू ) भिवंडी तालुक्यातील भरोडी गावचे रिक्षाचालक श्री. प्रदीप वामन पाटील व सौ.भारती प्रदीप पाटील यांची सुकन्या कुमारी दिव्या प्रदीप पाटील हिने जिजाऊ अकॅडमी अनंगाव या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन मुंबई पोलीस दलात जाण्याचे स्वप्न साकार केले. ती प्रशिक्षण घेत असताना तिने भिवंडी येथील बी एन एन महाविद्यालयात कला शाखेत (बी.ए)पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. अशा या आमच्या रिक्षा चालकाच्या सुकन्येचा सन्मान झाला पाहिजे या उद्देशाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख तथा ओम साई रिक्षा युनियन माणकोली दापोड्याचे संस्थापक- अध्यक्ष श्री.कुंदन तुळशीराम पाटील यांनी शिवसेना पदाधिकारी व रिक्षा युनियनचे सर्व पदाधिकारी यांना सोबत घेऊन रिक्षा चालक प्रदीप वामन पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन कुमारी दिव्या पाटील हिचे अभिनंदन करून शाल ,पुष्पगुच्छ व गणेशमूर्ती देऊन सन्मान केला.यावेळी दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक-डाॅ.श्री.किशोर बळीराम पाटील,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उप- तालुकाप्रमुख श्री. चक्रधारी मगन पाटील,उप- तालुकाप्रमुख श्री.मोहन गायकवाड, संपर्क सचिव श्री.संदीप मनोहर पाटील,ओम साई रिक्षा युनियनचे सल्लागार- विजय पाटील ,संजय पाटील, सुभाष माळी, सतिष म्हात्रे,उपाध्यक्ष- दिगंबर पाटील,संदीप पाटील, दिपक माळी,सेक्रेटरी- नरसू माळी,भरत पाटील, खजिनदार बलवंत केणी, जनक पाटील कार्याध्यक्ष -देविदास माळी,विरचन पाटील,अरुण केणी, स्टँड अध्यक्ष राजु पाटील,अकाश मुकादम,व मोठ्या संख्येने रिक्षा चालक वर्ग उपस्थित होते.जिद्द व चिकाटीने दिव्या पाटील येणे प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस दलात जाण्याचा मान पटकावला याचा आम्हा सर्व शिवसैनिक व रिक्षाचालक वर्गाला अभिमान आहे यापुढेही तिने चांगल्या प्रकारे पोलीस दलात सेवा करून आपल्या गावाचे नाव रोशन करावे याच तिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ठाणे जिल्ह्याच्या व सर्व रिक्षा चालकांच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा असे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख श्री. कुंदन तुळशीराम पाटील यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरणशी बोलताना सांगितले.हा माझा सन्मान नसून माझ्या आई-वडिलांचा व गावाचा सन्मान आहे. तसेच जिजाऊ अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष श्री.निलेश सांबरे यांनी जर मला मोफत शिक्षण दिले नसते तर मी हे स्वप्न साकार करू शकले नसते म्हणून याचे सर्व श्रेय मी निलेश सांबरे यांना देते असे कुमारी दिव्या प्रदीप पाटील हिने दैनिक स्वराज्य तोरणशी बोलताना सांगितले.तिच्या या उज्वल यशाबद्दल तिचे दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक , भिवंडी पत्रकार महासंघाचे अध्यक्ष तधा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष-डाॅ.श्री.किशोर बळीराम पाटील यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]