नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आदर्श सरपंच पुरस्काराने सौ. करिश्मा मांजरे यांचा गौरव – आजचा महाराष्ट्र

आदर्श सरपंच पुरस्काराने सौ. करिश्मा मांजरे यांचा गौरव

प्रतिनिधी दिलीप करकरे 

रायगड ( माणगाव ) :- माणगाव तालुक्यातील मु. पहेल येथील सौ. करिश्मा प्रसाद मांजरे यांना दैनिक महासागर रायगड रत्न – आदर्श सरपंच पुरस्कार २०२६ जाहीर झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.ग्रामविकास, लोकसहभाग आणि गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या कार्यामुळे गावपातळीवर विकासकामांना गती मिळाली असून, सर्वसामान्यांच्या

प्रश्नांवर संवेदनशीलतेने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.या पुरस्कारामुळे मु. पहेल, ता. माणगाव, जि. रायगड गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि ग्रामविकासाच्या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.सौ. करिश्मा प्रसाद मांजरे यांना हा सन्मान जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]