निलेश मांदाडकर यांची म्हसळा तालुका भाजप अध्यक्षपदी निवड
प्रतिनिधी दिलीप करकरे
रायगड (म्हसळा) :- म्हसळा तालुक्यातील सक्रिय कार्यकर्ते निलेश परशुराम मांदाडकर यांची भारतीय जनता पक्षाच्या म्हसळा तालुका प्रभारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.निलेश मांदाडकर हे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात अनेक वर्षांपासून सक्रिय असून त्यांनी विविध पदांवर कार्य करत संघटनात्मक कामाला बळ दिले आहे. 
त्यांनी आतापर्यंत अनेक महत्त्वाची पदे भूषविली असून त्यामध्ये खरसई शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, मेंदडी गण हिंदू संघटनेचे अध्यक्ष, खरसई येथील सोमजाई देवी मंदिर ट्रस्ट आणि म्हसळा तालुका फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. याशिवाय महाड येथील विनय शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, खरसई संचालक, रायगड जिल्हा भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, खरसई विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष आणि म्हसळा हॉटेल संघटनेचे सचिव म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. २००२ ते २०२६ या प्रदीर्घ काळात त्यांनी खरसई ग्रामपंचायतीचे सदस्य आणि माजी सरपंच म्हणूनही ग्रामीण विकासात मोलाचे योगदान दिले आहे. तसेच मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण समितीचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत.भाजप संघटनेत काम करताना निलेश मांदाडकर यांनी पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या दांडग्या अनुभवामुळे म्हसळा तालुक्यात पक्ष संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. ही निवड दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष मा. खासदार धैर्यशील पाटील, रायगड जिल्हा सरचिटणीस सतीश धारप, श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष प्रशांत शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष नाना महाले, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष श्री निलेश थोरे,जिल्हा चिटणीस व माजी अध्यक्ष शैलेशकुमार पटेल, माजी तालुकाध्यक्ष तुकाराम पाटील, तालुका उपाध्यक्ष भालचंद्र करडे आणि तालुक्यातील विविध सेलच्या अध्यक्षांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













