कल्याण येथे श्री श्याम सेवा परिवार संस्था आयोजित श्री खाटू श्याम जी भजन संध्या उत्साहात संपन्न!
प्रतिनिधी
ठाणे :- कल्याण पश्चिम येथील योगीधाम परिसरातील ग्रीन सिटी लॉन, सिटी पार्क येथे रविवार दिनांक १५/३/२०२६ रोजी संध्याकाळी सहा वाजता भक्तिमय वातावरणात श्री खाटू श्याम जी भजन संध्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. श्री श्याम सेवा परिवार संस्था यांच्या वतीने प्रथमच आयोजित या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात भक्तीमय भजनांनी झाली सुप्रसिद्ध भजन गायक यश बियाला आणि भजन गायिका ट्विंकल 
बगाडिया यांच्या मधुर आवाजात श्याम भक्तीचे भजन सादर केले गेले. मंदिरात अलौकिक शृंगार, छप्पन भोग आणि श्याम रसोई यांचे विशेष आयोजन करण्यात आले होते.यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होऊन भाविक मोठ्या श्रद्धेने भजनाचा आनंद घेत होते. कार्यक्रमादरम्यान भाविकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी (Free Medical Checkup) शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये रक्त तपासणी ,डोळे तपासणी, कान, घसा, नाक तपासणी, रक्तदाब तपासणी, जनरल आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, दातांची तपासणी, जॉईंट ग्रुप ऑफ मेट्रो व अनिल डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्या सौजन्याने करण्यात आले होते अशी माहिती श्री श्याम सेवा परिवार संस्थेचे पदाधिकारी श्री नटवर वर्मा यांनी दिली.तसेच त्यांनी सांगितले की, समाजात भक्तीभाव वाढावा आणि लोकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता त्यामुळे भाविकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













