नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जागतिक महिला दिनानिमित्त ७५ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा उपक्रम उत्साहात! – आजचा महाराष्ट्र

जागतिक महिला दिनानिमित्त ७५ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा उपक्रम उत्साहात!

प्रतिनिधी

अकोले :- जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व एन.के.टी. ट्रस्ट समूह यांच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा भव्य सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ७५ महिलांचा सन्मानचिन्ह, साडी तसेच विविध उपयुक्त वस्तू देऊन गौरव करण्यात आला. तर ११ महिलांना स्मृतिचिन्ह, विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती आणि संविधान देऊन विशेष सन्मान करण्यात आला.हा उपक्रम महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, दैनिक समर्थ गांवकरी व एन.के.टी. ट्रस्ट समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना मानपत्र, साडी, हरिपाठ, मिठाई, पेन व किचन साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, तालुक्यातील अनेक महिला गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्यात सक्रिय असून त्यांचा समाजासाठी मोठा वाटा आहे. अशा भगिनींचा सन्मान करण्याचे भाग्य आज आम्हाला लाभले आहे. समाजातील गरजू आणि अडचणीत असणाऱ्या कुटुंबांना मदत करण्यासाठी आपला ट्रस्ट सतत कार्यरत असून अनेक महिलांना वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.यावेळी संगीता साळवे, रेखाताई कोटकर, अस्मिता पिसाळ, वंदना बांगर, संगीता धुमाळ, नयना पांडे, सुनिता उगले, मंदा नायकवाडी, स्वाती ताजणे, गावंडे मॅडम तसेच मंगल गावंडे आदी महिलांचा सन्मान करण्यात आला.डॉ. आरोटे पुढे म्हणाले की, एखाद्या कुटुंबात कोणी आजारी असल्यास किंवा संकटात सापडल्यास ट्रस्टच्या माध्यमातून शक्य ती मदत करण्यात येईल. देवठाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीच्या कुटुंबालाही पन्नास हजार रुपयांची मदत करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.या प्रसंगी संगीताताई साळवे या समाजातील महिलांच्या सुखदुःखात नेहमी धावून जाणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी त्यांचे कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.जागतिक महिला दिनानिमित्त संपूर्ण देशात महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव केला जातो. देशाच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांना संधी मिळाल्याने भारतीय महिलांचा सन्मान उंचावला आहे. आज महिला शिक्षण, उद्योग, प्रशासन, सामाजिक क्षेत्र अशा सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी अशा प्रकारचे प्रेरणादायी उपक्रम राबवले जातात.या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अकोले तालुका अध्यक्ष अशोक उगले, इगतपुरी तालुका अध्यक्ष पोपट गवांदे, निखिल भांगरे, नामांकित उद्योजिका निशा मोरे, आशा वर्कर्स संघटनेच्या संगिता साळवे ग्रामपंचायत संगणक ऑपरेटर रेखाताई कोटकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा हा सन्मान सोहळा उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]