नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ज्येष्ठ चित्रकार किशोर ठाकूर वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्काराने होणार सन्मानित – आजचा महाराष्ट्र

ज्येष्ठ चित्रकार किशोर ठाकूर वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्काराने होणार सन्मानित

प्रतिनिधी

रायगड (पेण) :- महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयातर्फे दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार’ सन २०२३-२४ साठी रायगड जिल्ह्यातील पेण (उंबर्डे) येथील ज्येष्ठ चित्रकार किशोर ठाकूर यांना जाहीर झाला आहे.हा पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार दि.१० मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता मुंबईतील ऐतिहासिक जहांगीर आर्ट गॅलरी येथे पार पडणार आहे. ६५ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाच्या (कलाकार

विभाग) उद्घाटन समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.पेण तालुक्यातील उंबर्डे येथील रहिवासी असलेले किशोर ठाकूर (जन्म : १ जून १९५७) यांनी शिल्पकला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी १९७७ मध्ये महाराष्ट्र शासनाकडून ‘आर्ट टीचर’ डिप्लोमा प्राप्त केला. त्यानंतर सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथून १९८१ मध्ये शिल्पकला व मॉडेलिंग (G.D. Art – Sculpture & Modelling) आणि १९८७ मध्ये मेटल क्राफ्ट (G.D. Art) शिक्षण पूर्ण केले.त्यांच्या कलाकृतींना राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनातील विविध विभागांमध्ये त्यांनी अनेक वेळा पुरस्कार पटकावले असून १९९१ मध्ये राजस्थान ललित कला अकादमी, जयपूर यांचा राष्ट्रीय पुरस्कार तसेच २००४ मध्ये ललित कला अकादमी, नवी दिल्ली यांचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला आहे.मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी, नेहरू सेंटर आर्ट गॅलरी आणि बजाज आर्ट गॅलरी येथे त्यांच्या अनेक एकल कला प्रदर्शनांचे आयोजन झाले आहे. तसेच देश-विदेशातील विविध कला प्रदर्शनांमध्ये आणि शिल्पकला शिबिरांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.त्यांच्या शिल्पकृतींचा संग्रह ललित कला अकादमी, नवी दिल्ली, मॉडर्न आर्ट गॅलरी, नवी दिल्ली तसेच गोवा कला अकादमी येथे जतन करण्यात आला आहे. शिल्पकला क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकालीन योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शासनाकडून त्यांना हा मानाचा ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]