नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , लोटे एमआयडीसीतील केमिकल कंपन्यांत होतात वारंवार स्फोट – आजचा महाराष्ट्र

लोटे एमआयडीसीतील केमिकल कंपन्यांत होतात वारंवार स्फोट

प्रतिनिधी

स्वतंत्र चौकशी करण्याची कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीची मागणी

मुंबई :- डॉ. खान केमिकल्स कंपनीत झालेल्या स्फोटात पाच कामगार जखमी झाले असनू त्यांच्यावर मंबईतील एका रुग्णालयात उपचार सरूु आहेत. मात्र या घटनेबाबत संबंधित कंपनीकडून कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात येत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या संदर्भात शासनाने स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीने केली आहे.लोटे एमआयडीसी परिसरात केमिकल कंपन्यांमधील अपघात स्थानिकांसाठी नवीन नाहीत. २०२१ पासूनच्या घटनांकडे पाहिले तरी

अनेक गंभीर अपघात घडले आहेत. घरडा केमिकल कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात चार कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुष्कर केमिकल्स, सुप्रिया केमिकल्स, विनती ऑर्गेनिक आणि डिवाईन केमिकल्समध्येही स्फोट किंवा आग लागण्याच्या घटना घडल्या असूनअनेक कामगार जखमी मृत्यू मुखी पडलेत जखमी झाले आहेत. त्यामुळे डॉ. खान केमिकल्समधील स्फोट ही दुर्दैवी घटना असली तरी ती नवीन नाही, असे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी म्हटलेआहे.डॉ. खान केमिकल्स कंपनीमध्ये इथेनॉल या कच्च्या मालाचा वापर करून Ethyl Silicate (TEOS)आणि Pre-Hydrolyzed Ethyl Silicate ही रसायने तयार केली जातात. या प्रक्रियेत निर्माण होणारा अल्कोहोल आधारित कचरा अत्यंत घातक असनू तो तळोजा येथील इन्सिनरेटर मध्ये नष्ट करणे आवश्यक आहे. मात्र संबंधित कंपनी हा कचरा स्थानिक विक्रेत्यांमार्फत अनियमित पद्धतीने नष्ट करतात.लोटे एमआयडीसी परिसरात अग्निसुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याची गंभीर परिस्थिती असून फॅक्टरी इन्स्पेक्टरचे कार्यालय कोल्हापरू येथे असल्यामुळे अपघात झाल्यानंतर अधिकारी उशिरा घटनास्थळी पोहोचतात. गॅस गळती सारख्या गंभीर घटनां नंतरही प्रशासन वेळेवर उपस्थित राहत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच PFAS हे अत्यंत घातक रसायन बनविणारी लक्ष्मी ऑर्गानिक कंपनी बंद करावी. PFAS हे तर अत्यंत घातक रसायन असनू पर्यावरण आणि मानवी आरोग्यास मोठा धोका निर्माण करू शकते. या घातक उत्पादनामुळे इटलीमध्ये बंद करण्यात आलेल्या कंपनीचे उत्पादन इथे आल्यावर घातक नाही हे म्हणणे चुकीचे असल्याचे दलवाई यांनी नमदू केले.या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात यावी. कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीच्या माध्यमातनू स्थानिक नागरिकांना एकत्र करून या प्रश्नांवर लढा सरूु ठेवणार असल्याचेही हुसेन दलवाई यांनी सांगितले.                

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]