नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रोहा येथे मोफत आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – आजचा महाराष्ट्र

रोहा येथे मोफत आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी महेश भोकटे

रोहा (जि. रायगड) :- परिवर्तन सामाजिक संस्था, रोहा-रायगड यांच्या पुढाकाराने तसेच धन्वंतरी मेडिकेअर व वत्सल मल्टिस्पेशालिस्ट क्लिनिक यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हे शिबिर रविवारी विठ्ठल मंदिर परिसरात सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत पार पडले.शिबिरामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध आजारांची मोफत तपासणी, औषध वाटप तसेच आवश्यक रुग्णांना शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

फॅमिली फिजिशियन, सर्दी-खोकला, ताप, त्वचारोग, लहान मुलांचे आजार, हृदयविकार, सांधेदुखी, पोटाचे विकार, मधुमेह आदी आजारांवरील सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून देण्यात आला. याशिवाय काही निवडक शस्त्रक्रियांसाठी नोंदणीही करण्यात आली.ग्रामीण भागातील नागरिकांना योग्य वेळी वैद्यकीय सेवा मिळावी, तसेच आर्थिक अडचणींमुळे उपचार टाळणाऱ्या रुग्णांना मदत व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.या शिबिरात महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. उपस्थितांनी अशा उपक्रमांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. आयोजनासाठी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले असून स्थानिक नागरिकांनी संस्थेचे आभार मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]