श्री गणेश जयंती निमित्त गाडेकर परिवाराकडून बालकांना खाऊ वाटप
प्रतिनिधी
मुंबई :- दि.२२जानेवारी २०२६ रोजी माघ गणेश जयंती निमित्त श्री स्वप्निल गाडेकर परिवाराकडून प्रथम वर्ष तांडेल सदन, करावे गाव नेरूळ,सीवूड नवी मुंबई येथे लालबागचा राजा प्रतिकृती श्री गणेश मूर्तीची घरगुती स्थापना करण्यात आली.त्यानिमित्त साईवाडी येथील अंगणवाडी क्रमांक २०७ करावे गाव, नागदेवी माता मंदिर सीवूड 
पश्चिम परिसरात अंगणवाडीतील बालकांना वरिष्ठ नागरिक श्री ज्ञानेश्वर तांडेल यांच्या हस्ते बिस्किट पाकिटाचे वाटप करण्यात आले.यावेळी फेस कॉम चे संपर्कप्रमुख श्री दिलीप गाडेकर हेही उपस्थित होते. अंगणवाडीत एकूण 30 विद्यार्थी असून शिक्षिका सौ विद्या बोराडे व मदतनीस सौ छाया जाधव ज्येष्ठ नागरिक विठ्ठल ढवळे यांच्या साक्षीने या बालकांना खाऊ वाटप करण्यात आला.सदर कार्यक्रमासाठी श्री सुरेश पोटे फेस कॉम मुंबई अध्यक्ष यांचे मार्गदर्शन लाभले. ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत बालकांना खाऊ वाटल्यामुळे शिक्षिका सौ विद्या बोराडे यांनी श्री गाडेकर परिवार व तांडेल यांचे आभार मानले.या उपक्रमाचे कौतुकही करण्यात आले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













