न्यू इंग्लिश स्कूल व श्री. पी. के. दरेकर ज्युनियर कॉलेज, खवटी यांचा वनभोजन उपक्रम उत्साहात संपन्न
प्रतिनिधी राजेंद्र दळवी
रत्नागिरी (खेड) :- खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्था, खवटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व श्री. पी. के. दरेकर ज्युनियर कॉलेज, खवटी यांचा वनभोजन उपक्रम बुधवार, दि. ७ जानेवारी २०२६ रोजी कृषी विद्यालय, खवटी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमात इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्थेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.कृषी विद्यालय, खवटी येथील प्राचार्य मा. श्री. गायकवाड सर यांनी
वनभोजनासाठी संपूर्ण विद्यालयाचा परिसर उपलब्ध करून दिला. विद्यार्थ्यांसाठी येथे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. शाकाहारी व मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध खेळ, मनोरंजनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा मनमुराद आनंद घेतला.वनभोजन उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सान्निध्यात नेऊन हिरव्यागार व प्रसन्न वातावरणात एकत्रित भोजनाचा आनंद घेण्याची संधी देणे व सहकार्याची भावना वृद्धिंगत करणे हा होता.कार्यक्रमादरम्यान संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. मन्सूरभाई जोगिलकर यांनी विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली. शालेय पोषण आहार बनवणाऱ्या स्वयंपाकी काकी सौ. स्वाती सुतार व सौ. ऋतुजा सुतार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था करून विद्यार्थ्यांना वेळेत भोजन उपलब्ध करून दिले. भोजन वाढप्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनीही सहकार्य केले.या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. मन्सूरभाई जोगिलकर, सचिव मा. श्री. धनंजय दरेकर, संचालक मा. श्री. कैलास यादव, मा. श्री. सुनील शिंदे, खेड येथील उद्योजक बशीर हजवानी यांचे बंधू श्री. सिराज हजवानी, शाळेचे माजी विद्यार्थी श्री. सईमभाई शेख, न्यूज रिपोर्टर श्री. राजेंद्र दळवी आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थ्यांसोबत भोजनाचा आस्वाद घेत उपक्रमास शुभेच्छा दिल्या.खवटी गावचे उपसरपंच मा. श्री. शैलेश दळवी यांनी वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध करून सहकार्य केले. मुख्याध्यापक श्री. विजयकुमार माळी सर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कृषी विद्यालयाचे प्राचार्य श्री. गायकवाड सर, संस्था पदाधिकारी व सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. दिलीपजी राणे यांनी उपक्रमासाठी सहकार्य, मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या. सर्व शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचे योग्य नियोजन केले. अखेरीस हा वनभोजन उपक्रम अत्यंत आनंददायी व उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













