नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , हिंदुराज मित्रमंडळ खेडची पालखी पायी यात्रा उत्साहात पार पडली – आजचा महाराष्ट्र

हिंदुराज मित्रमंडळ खेडची पालखी पायी यात्रा उत्साहात पार पडली

प्रतिनिधी राजेंद्र दळवी 

रत्नागिरी (खेड) :- सालाबादप्रमाणे इंग्रजी नववर्षाच्या सुरुवातीला येणाऱ्या पहील्या गुरुवारी हिंदुराज मित्रमंडळ खेड यांचे वतीने आयोजित करण्यात आलेला पालखी पायी यात्रा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला सदर पायी यात्रेची सुरुवात खेडभरणेनाका येथील श्री काळकाई देवी मंदिर येथून करणेत आली काळकाई देवी मंदिर ते कशेडी श्री स्वामी समर्थ महाराज मठ पालखी सोहळा हजारो भक्तगणांच्या उपस्थिती मध्ये पार पडला न भूतो न भविष्यती असा हा पायी वारी चा सोहळा भक्तांना याची देही याची

डोळा पहायला मिळला हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडणेकरीता हिंदुराज मित्रमंडळाचे अध्यक्ष सन्मा श्री बुवा शिंदे पप्पूशेठ चिकणे व मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेऊन पार पडला या कार्यक्रमाला उपस्थित माजी आमदार संजयराव कदम मा अण्णा कदम खेड नगरपरिषदेच्या नुतन नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला खेड नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक या सर्वांचा कशेडी मठाचे वतीने सत्कार करण्यात आला  कु राखी रविंद्र दळवी ( खवटी)हीने एम पी एस सी या स्पर्धेत उत्तम यश संपादन केल्याबद्दल तिचा देखील कशेडी मठाच्या वतीने सन्मान करण्यात आला उपस्थित भक्तगणांचे व मान्यवरांचे स्वागत व आभार श्री समीरदादा मोरे यांनी केले यावेळी मठाचे विश्वस्त श्री शेलार साहेब कशेडी गावचे सरपंच श्री संजयराव दरेकर माजी सरपंच श्री सुरेशराव दरेकर माजी उपसभापती श्री विश्वासराव दळवी यांनी उपस्थित भक्तगणांचे स्वागत केले

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]