नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , TCRTCSW ट्रस्टचा “एक हात मदतीचा” उपक्रम; कल्याण रेल्वे स्थानकावरील सफाई कर्मचाऱ्यांना अन्नधान्य किट्सचे मोफत वाटप… – आजचा महाराष्ट्र

TCRTCSW ट्रस्टचा “एक हात मदतीचा” उपक्रम; कल्याण रेल्वे स्थानकावरील सफाई कर्मचाऱ्यांना अन्नधान्य किट्सचे मोफत वाटप…

प्रतिनिधी

मुंबई :- TCRTCSW ट्रस्ट, मुंबईने आपल्या ३९ व्या वर्षात पदार्पण केल्याच्या औचित्याने नववर्षाचे स्वागत समाजोपयोगी उपक्रमातून केले. “एक हात मदतीचा” या उपक्रमाअंतर्गत कल्याण रेल्वे स्टेशनवर कार्यरत असलेल्या साफसफाई कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक अन्नधान्य किट्सचे मोफत वाटप करण्यात आले.हा कार्यक्रम शनिवार, दिनांक ०३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता स्टेशन मॅनेजर कार्यालय, कल्याण प्लॅटफॉर्म क्रमांक १ येथे संपन्न झाला. सदर किट्सचे वाटप स्टेशन मास्टर हरजी राम मीना, राजेंद्र गुजरे (CPS, KYN) व राहुल मालविया (DY CPS, KYN) यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.या

उपक्रमासाठी डॉ. दिनेश ठक्कर (स्वामीनारायण हॉल, कल्याण), डॉ. निखिलभाई चंदेरिया (रोटी डे ग्रुप, कल्याण), डॉ. किशोर बळीराम पाटील (संपादक – दैनिक स्वराज्य तोरण), श्रीमती मधुबेन जे. ठक्कर, श्री. पुजारा (समाजसेवक) व श्रीमती ज्योतीबेन पुजारा (समाजसेविका) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच ट्रस्टच्या सर्व सक्रिय सदस्यांचे योगदान उल्लेखनीय ठरले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष डि. व्ही. चिंदरकर, सचिव एच. एम. मोंडकर, खजिनदार जी. बी. कदम, उपाध्यक्ष अभय कांबळे, ट्रस्टी रवींद्र बिरवटकर, प्रसाद करलकर तसेच सुनील नैनानी, पी. डी. मोरे, युवराज डोहाळे व शशांक दीक्षित यांनी विशेष परिश्रम घेतले.TCRTCSW ट्रस्टच्या या उपक्रमामुळे नववर्षाची सुरुवात सामाजिक बांधिलकी जपत केल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त केली गेली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]