नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पत्रकार दिनानिमित्त भिवंडीतील पत्रकारांना ब्लँकेट व भेटवस्तूंचे वाटप – आजचा महाराष्ट्र

पत्रकार दिनानिमित्त भिवंडीतील पत्रकारांना ब्लँकेट व भेटवस्तूंचे वाटप

प्रतिनिधी

ठाणे :- (भिवंडी) ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य मराठी दैनिक स्वराज्य तोरण व स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचे औचित्य साधून भिवंडी शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता स्वराज्य तोरण कार्यालय, कैलासनगर, वळपाडा येथे होणार आहे.या कार्यक्रमात स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील यांच्या शुभहस्ते पत्रकारांना ब्लँकेट व विविध भेटवस्तूंचे वितरण करण्यात येणार आहे. पत्रकारांच्या कार्याचा सन्मान व त्यांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.संपादक डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील हे नेहमीच

पत्रकारांच्या हितासाठी कार्यरत असून उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये पत्रकारांना उपयुक्त ठरणाऱ्या विविध भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करीत असतात. यामध्ये रेनकोट, हेल्मेट, मोदी जॅकेट, पेन, डायरी, किराणा साहित्य, छत्री तसेच लेटरहेड आदी वस्तूंचा समावेश आहे.या शुभप्रसंगी भिवंडी शहर व ग्रामीण भागातील सर्व पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन स्वराज्य तोरण परिवाराकडून करण्यात आले आहे.

(विशेष सूचना पत्रकारांनी आपल्या पेपरचे नाव किंवा युट्युब चैनल चे नाव आचार्य सुरजपाल यादव (९६७३६५६६०३) अफसर खान (९८६०५४३४६०)सोमनाथ ठाकरे(९२७३३३३३०२)अरविंद जयस्वाल (९८३४४६८४२५) यांच्याशी संपर्क साधून नोंदणी करून घेणे आवश्यक आहे याची नोंदणी होणार नाही त्यांचा विचार केला जाणार नाही…)

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]