नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कोलाड पंचक्रोशीतर्फे रायगड अभ्यास मोहीम उत्साहात सुरू; विद्यार्थ्यांना इतिहासाचे प्रत्यक्ष मार्गदर्शन… – आजचा महाराष्ट्र

कोलाड पंचक्रोशीतर्फे रायगड अभ्यास मोहीम उत्साहात सुरू; विद्यार्थ्यांना इतिहासाचे प्रत्यक्ष मार्गदर्शन…

प्रतिनिधी महेश स्वामी जंगम 

रायगड (रोहा- कोलाड ) :- सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशी यांच्या विद्यमाने आयोजित दुर्गदुर्गेश्वर श्रीमान श्री रायगड अभ्यास मोहीम शनिवार, दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ठीक ३ वाजता उत्साहात सुरू झाली. सायंकाळी ६ वाजता अभ्यास मोहीम रायगडाच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर रायगड अभ्यासक श्री. रामजीदादा कदम यांनी कोलाड हायस्कूल व कोलाड ज्युनियर कॉलेजच्या सुमारे ६० विद्यार्थ्यांना रायगड पायथा व रहाळ परिसराची सखोल ऐतिहासिक माहिती दिली.या वेळी गडतज्ज्ञ व इतिहास संशोधक श्री. यशवंत पुत्र मोहनदादा फराडे हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमास सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशी संघटनेचे श्री.

अनंतराव जोशी, श्री. महेश स्वामी जंगम, श्री. अनंत सानप, श्री. स्वप्निल विचारे, कुमार श्रीनिवास जोशी, श्री. विजय शिंदे, सौ. पल्लवी शिंदे यांची उपस्थिती होती. देव, देश व धर्म या कार्याचा वसा घेऊन संघटना सातत्याने सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबवत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.या आगळ्या-वेगळ्या अभ्यास मोहिमेचे आयोजन पत्रकार श्री. प्रसाद मोरे यांच्या समवेत करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी रायगडाच्या इतिहासासंदर्भात श्री. रामजीदादा कदम यांना विविध प्रश्न विचारले. त्यांनी त्यास सविस्तर व समर्पक उत्तरे दिली. याचवेळी ‘लव्ह जिहाद’सारख्या गंभीर सामाजिक विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच तरुण-तरुणींनी अशा प्रकारांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत मोलाचे विचार मांडले. संघटनेच्या वतीने यासंदर्भातील पुस्तकेही विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आली.उद्या रविवार, दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजता रायगड दुर्गरोहणास सुरुवात होणार असून, दुर्गदुर्गेश्वर श्री रायगडचा संपूर्ण इतिहास रायगड अभ्यासक श्री. मोहनदादा फराडे हे सहभागी विद्यार्थ्यांना सांगणार आहेत. सायंकाळी ६ वाजता गड उतारानंतर या अभ्यास मोहिमेची सांगता होणार आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]