नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जेष्ठ नागरिकास महिना ७००० रु.मानधन महाराष्ट्र शासन देणार-डॉ.जयपाल पाटील – आजचा महाराष्ट्र

जेष्ठ नागरिकास महिना ७००० रु.मानधन महाराष्ट्र शासन देणार-डॉ.जयपाल पाटील

प्रतिनिधी

अलिबाग :- महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिकांची संख्या वाढत असून त्याच्या साठी महाराष्ट्र शासनामार्फत विविध योजना बाबत दिनांक १५ जुलै २०२५ रोजी विधेयक मंजूरीचे राजपत्र प्रसिद्ध केले आहे.याबद्दल महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिक संघटना,समाज सेवक पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी आणी महाराष्ट्र मुख्य मंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करीत आहेत. या योजना मिळविण्यासाठी वयाची ६५ वर्ष पुर्ण झाली असतील त्याचे भारत

सरकारचे अथवा महाराष्ट्र शासनाचे जेष्ठ नागरिक ओळखपत्र शासनाच्या ईसेवा केंद्रात काढावे असे मार्गदर्शन अलिबाग जेष्ठ नागरिक संघटनेच्या मासिक बैठकीत जेष्ठ पत्रकार प्रा.डॉ.जयपाल पाटील यांनी सांगितले.यावेळेस अध्यक्ष श्री.प्रफुल्ल राऊत व उपाध्यक्षा सौ.चारुशिला कोरडे व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळेस प्रा.डॉ.जयपाल पाटील म्हणाले ज्या जेष्ठ नागरिकास कोणतीही पेन्शन मिळत नाही,त्याना आता दरमहा रु.७०००/-मिळणार असुन,महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे, मंदिरे पाहण्यास वर्षाला रु.१५०००/-अनुदान मिळणार असून, निराधार जेष्ठाना राहण्याची व जेवणाची सोय मोफत महाराष्ट्र शासन करणार आहे. केंद्र सरकारने 70वर्षावरील जेष्ठांना रेल्वे प्रवास ५० टक्के सवलत तर महाराष्ट्र राज्य परिवहन कडून एस.टी.प्रवास ५० टक्के सवलत त्याच बरोबर मालमत्ता करात ३० टक्के सवलत देण्यात येणार आहे.आरोग्य समस्या साठी सरकारी रुग्णालयात मोफत उपचार आहेतच, सोबत खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया साठी रु.५ लाख मिळणार आहेत. यासाठी प्रत्येक जेष्ठ नागरिकांनी केंद्र अथवा महाराष्ट्र शासनाचे ओळखपत्र काढणे आवश्यक आहे, यामधे सरकारकडून ३ विभागात कार्डाची आखणी केली असुन वय वर्ष ८० वर सुपर कार्ड,वय ७० च्या वर मध्यम कार्ड आणी ६५ वर्षावरील सर्व योजना प्राप्त होणार असे डॉ.जयपाल पाटील यांनी सांगितले.व कोणतीही आपत्ती आल्यावर रायगडचा युवक फाउंडेशनला संपर्क साधून सेवा करण्याची संधी द्यावी असे सांगितले.यावेळेस संघटनेचे सचिव श्री.नंदु तळकर ,सहसचिव श्रीमती मेघना कुलकर्णी,खजिनदार प्रणिता वर्तक, श्री.आर.के.घरत,कार्यकारिणी सदस्य व ईतर सभासद उपस्थित होते.

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]