नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , चंद्रकांत जनार्दन यादव यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दक्षिण रायगड सहसमन्वयक पदी नियुक्त – आजचा महाराष्ट्र

चंद्रकांत जनार्दन यादव यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दक्षिण रायगड सहसमन्वयक पदी नियुक्त

प्रतिनिधी पांडुरंग माने

रायगड (गोरेगाव) :- चंद्रकांत यादव हे शिवसेनेचे एक निष्ठावन्त कार्यकर्ते म्हणून त्याची ओळख 1985 च्या दशका पासून शिव सेनेत त्यांचा सहभाग आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेने चे झोकून काम करण्यात नेहमी अग्रेसर असतात गोरेगावं शिवसेने चे शहर प्रमुख,सन 1997 ग्रामपंचायत सदस्य,नळ पाणी पुरवठा चेअरमन, माजी तंटामुक्त अध्यक्ष,गुरुवार आठवडा बाजाराच सुरु करण्यात मुख्य सहभाग, गोरेगावं नाभिक समाजाचे अध्यक्ष असे अनेक पदे त्यांनी भूषवली आहेत.सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांचा नेहमी सहभाग तसेच एक निष्टने शिवसेनेत सक्रियम्हणूनच पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेबसाहेब ठाकरे यांच्या शिफारिनुसार आणि आदेशाने त्यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना दक्षिण रायगड

जिल्हा सहसमन्वयक पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली तसे शिवसेना मध्येवर्ती कार्यालयातून पत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आले स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते मातोश्री या निवास्थानी चंद्रकांतजी यादव यांनी भेट घेऊन आशीर्वाद घेतले त्यांच्या या झालेल्या निवडी ने.कार्यकर्त्यांन मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]