भुवनेश्वर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी “भुमीपुत्र सुरेश मगर” यांचे नाव आघाडीवर बहुजन एकवटणार!
प्रतिनिधी समीर बामुगडे
रायगड (रोहा) : रोहा तालुक्यातील भुवनेश्वर गटात होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भुमीपुत्र सुरेश मगर यांच्या उमेदवारीसाठी स्थानिक तरुण वर्गाने मोठा पुढाकार घेतला आहे.“आता नाही तर कधीच नाही” या घोषवाक्याखाली सुरेश मगर जनतेच्या हक्कासाठी आणि बहुजन समाजाच्या एकतेसाठी या निवडणुकीच्या रणांगणात उतरणार असल्याची बोलले जात आहे.धाटाव औद्योगिक क्षेत्रात स्थानिकांना रोजगार, स्थानिक विकास, आणि परीसरातील जनतेला न्याय या प्रमुख मुद्द्यांवर आधारित त्यांचा निवडणूक लढा राहणार असून, भुवनेश्वर जिल्हा परिषद परिसरातील जनतेच्या मूलभूत समस्या सोडवण्याचा सातत्याने त्यांनी पुढाकार घेतला आहे.गेल्या काही दिवसांपासून भुवनेश्वर जिल्हा परिषद मतदार संघातील आसपासच्या गावांमध्ये सुरेश मगर यांच्या उमेदवारीबाबत चर्चेला उधाण आले आहे.स्थानिक कार्यकर्ते, समाजसेवक आणि युवक वर्गातून त्यांच्या समर्थनार्थ मोठी चळवळ उभी राहताना दिसत आहे.गावोगावी सुरेश मगर यांच्या पाठिंब्याची लाट निर्माण झाली असून जनतेत “भुमीपुत्राचा आवाज बुलंद होणार!” असा विश्वास वाढत आहे.बहुजन समाज आता एकवटत असून या निवडणुकीत समाजाच्या एकतेचा आणि विकासाचा नवा अध्याय लिहिला जाईल, असा ठाम विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.सुरेश मगर हे खासदार सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक असून भविष्यातील जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या राष्ट्रवादीला त्यांचा फायदा होणार आहे त्यामुळे राष्ट्रवादी त्यांना संधी देणार असल्याचे बोलले जात आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













