हुतात्मा प्रतिष्ठानचा मुंबईतील के सी कॉलेजच्या विद्यार्थ्यासाठी अनोखा प्रकल्प
प्रतिनिधी डॉ. विष्णू भंडारे
मुंबई :- केसी कॉलेज व डोंबिवलीच्या हुतात्मा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने सायबर सिक्युरिटी कायदेशीर समिक्षा व भारतीय हवाई दलातील लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर्स यांचे प्रदर्शन व माहिती प्रकल्प हा कार्यक्रम बुधवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ०३ ते ०४.३० या वेळेत पार पडला.हुतात्मा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.डॉ.सुनिल कांबळे यांनी सायबर सुरक्षा व कायदेशीर समिक्षा यात 
लीगल सेक्शन ६२,६६,६७,६७ B,६९,४३ विद्यार्थ्यांना समजून सांगितले.भारतीय हवाई दलातील लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर्स यांचे प्रदर्शन व माहिती प्रकल्प या उपक्रमात राफेल, मिराज, सुखोई, तेजस, जग्वार, मिग २१, मिग २९ लढाऊ विमाने व ध्रुव, अपाची, चीनुक हेलिकॉप्टर यांची माहिती व महत्व विषद करताना डॉ. सुनिल कांबळे यांनी भारतीय हवाई दलाचे नागरी सुरक्षा व आपत्कालीन परिस्थितीतील योगदान यावर चर्चा व प्रश्नोत्तरे घेऊन या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना बोलते केले.प्रा. डॉ. सतीश कोलते रसायनशास्त्र विभाग प्रमुख, व प्रा. डॉ. मयुरेश जोशी लाइफ सायन्स विभाग यांच्या सक्रिय सहभागाने व सहयोगाने हा कार्यक्रम यशस्वी झाला.एच. आर. कॉलेजचे प्रा. डॉ. नवीन पंजाबी व प्रा.राहुल मिश्रा यांनी विशेष परिश्रम घेऊन या कार्यक्रमासाठी नियोजन केले.या कार्यक्रमासाठी २१ नेव्हल एन.सी.सी.,२७ आर्मी एन.सी.सी., ०३ एअर स्कॉड्रन एन.सी.सी.,कॅडेट्स उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













