नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , नवघर ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी प्रियदर्शनी अविनाश म्हात्रे – आजचा महाराष्ट्र

नवघर ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी प्रियदर्शनी अविनाश म्हात्रे

प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे

सर्वच स्तरातून प्रियदर्शनी म्हात्रे यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव.

रायगड (उरण ) :- दि .१९ महाविकास आघाडी आणि शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत नवघर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रियदर्शनी अविनाश म्हात्रे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी महाविकास आघाडीतर्फे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश राहाळकर,तालुकाप्रमुख संतोष शेठ ठाकूर, शेकापचे माजी उपसभापती महादेव बंडा ,उपतालुका संघटक कृष्णा घरत, शिवसेना जिल्हा वक्ता मनीषा नितीन ठाकूर सोशल मीडिया समन्वयक नितीन ठाकूर,द्रोणागिरी

शहर प्रमुख जगजीवन भोईर, नवघर चे माजी उपसरपंच रवींद्र भोईर, सुरेश बंडा, ज्येष्ठ शिवसैनिक के डी भोईर, विजय भोईर, ज्ञानेश्वर तांडेल, मनोहर कडू, उपशाखाप्रमुख विशाल डाके, शशिकांत तांडेल, युवासेना चेतन पाटील, रवीशेठ पाटील,सरपंच सविता मढवी, माजी उपसरपंच विश्वास तांडेल, माजी उपसरपंच दिनेश बंडा, माजी उपसरपंच संध्या पाटील,माजी सरपंच विद्यमान सदस्य आरती चौगुले, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर पाटील, मंगेशशेठ चौगुले, कुंदनशेठ बंडा, अतिशशेठ भोईर,नितीनशेठ मढवी, संतोषशेठ पाटील, ग्रामपंचायत सदस्य कुंदन कडू, कविता पाटील, नयना बंडा, शिवसेना शाखा नवघर चे पदाधिकारी प्रल्हाद म्हात्रे, रणजीत म्हात्रे संतोष घरत, रोहित भोईर, स्वप्निल घरत, सौरभ घरत आणि गावातील महिला शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.प्रियदर्शनी अविनाश म्हात्रे या गोर गरीब जनतेच्या मदतीला नेहमी धावून जातात. विविध अनेक विकासकामे त्यांनी केली आहेत. विकासात्मक दृष्टीकोण त्यांच्याकडे आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारे,जनतेची सेवा करणारे व्यक्तिमत्व असल्याने त्यांची निवड नवघर ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी झाली आहे. त्यांच्या या निवडीचे सर्वच स्तरातून स्वागत होत असून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]