राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रोहा तालुक्याचा श्री विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
प्रतिनिधी
रायगड (रोहा) :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रोहा तालुक्याचा श्री विजयादशमी उत्सव अत्यंत उत्साह, शिस्त आणि देशभक्तीच्या वातावरणात रविवार, दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३:३० वाजता नदी संवर्धन मैदान, रोहा (जि. रायगड) येथे संपन्न झाला.हिंदू समाजात शौर्य आणि शक्तीचे जागरण करणारा हा पवित्र सण यंदा अधिक वैशिष्ट्यपूर्ण ठरला, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या शताब्दी
पर्वानिमित्त स्वयंसेवकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. अशोक अप्पासाहेब जाधव (M.B.B.S., M.D. Gen. Med) यांनी आपल्या भाषणातून समाजसेवा, आरोग्य आणि नैतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.तर प्रमुख वक्ते श्री. सुनिलजी मधुकर पाटील, रायगड विभाग सहकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी संघाचे शताब्दी वर्ष, संघकार्याची दिशा आणि राष्ट्रनिर्मितीतील स्वयंसेवकांची भूमिका यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले.कार्यक्रमात स्थानिक स्वयंसेवकांनी प्रात्यक्षिके सादर केली तसेच शाखेचे महत्त्व, संघगीत आणि प्रार्थनेने वातावरण भारावून गेले.रोहा तालुका संघचालक श्री. मंदार रामचंद्र परांजपे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले आणि हिंदू समाजाच्या एकतेचा, संघटनेचा आणि राष्ट्रभक्तीचा संदेश दिला.या कार्यक्रमाला स्वयंसेवक, नागरिक, तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













