स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियानांतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन
प्रतिनिधी राजेंद्र दळवी
रत्नागिरी (खेड) :– प्राथमिक आरोग्य मंदिर तळे येथे दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियानांतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत तळेचे सरपंच श्री. शामराव मोरे यांच्या हस्ते झाले. तर प्रा.आ. केंद्र तळेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमेय हडकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.दीपप्रज्वलनाचे मानकरी म्हणून तंटामुक्ती अध्यक्ष श्री. विजय 
राव मोरे, डॉ. निखिल माळी, डॉ. कुणाल पाटील (बालरोग तज्ञ), डॉ. देविका बी. एस. (स्त्रीरोग तज्ञ), डॉ. ऋतुजा कवडे (योगिता डेंटल खेड) यांनी सहभाग घेतला.कार्यक्रमास विविध मान्यवर उपस्थित होते. यामध्ये श्री. मधुकर जाधव, श्री. शाहू शेलार, श्री. गायकर (सरपंच रसाळगड), किंजळे तर्फ नातूचे पोलीस पाटील मॅडम, नेत्र चिकित्सक श्रीमती कर्मकार, डॉ. जोती पाटे (जनरल मेडिसिन), सौ. सुष्मिता पाटील (परशुराम हॉस्पिटल, लोटे), श्री. पांडुरंग सोंडकर (ग्रामपंचायत देवघर) यांचा समावेश होता. मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या आरोग्य शिबिरामध्ये १४५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये बीपी, एचबी, शुगर, ईसीजी, दंत तपासणी, नेत्र तपासणी, गरोदर मातांची तपासणी तसेच आयुष्मान कार्ड, वंदन कार्ड यासह इतर आरोग्यविषयक सेवा पुरविण्यात आल्या.शिबिर यशस्वी होण्यासाठी श्रीमती केदारे, श्री. दिलीप घाडगे, श्री. दीपक यादव, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रद्धा जाधव, डॉ. अमेय हडकर, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांनी विशेष प्रयत्न केले.कार्यक्रमाच्या शेवटी सरपंच श्री. शामराव मोरे, डॉ. अमेय हडकर तसेच सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













