नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , माऊंट आबू येथे राष्ट्रीय मीडिया संमेलनात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ठाणे जिल्हा टीमचा सहभाग.. – आजचा महाराष्ट्र

माऊंट आबू येथे राष्ट्रीय मीडिया संमेलनात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ठाणे जिल्हा टीमचा सहभाग..

प्रतिनिधी

२६ ते ३० सप्टेंबर दरम्यान शांती, एकता आणि विश्वास वृद्धींगत करण्यासाठी माध्यमांच्या भूमिकेवर होणार चर्चा!

मुंबई (रायगड)  :- दि.२६ माऊंट आबू राजयोग शोध आणि प्रतिष्ठानच्या मीडिया विंग तर्फे २६ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत ब्रह्माकुमारीज् मुख्यालय, माऊंट आबू येथे राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. “समाजात शांती, एकता आणि विश्वास वृद्धींगत करण्यासाठी माध्यमांची भूमिका” या मुख्य विषयावर देशभरातील पत्रकार व मीडिया प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.या संमेलनात महाराष्ट्रातील ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ठाणे जिल्हा टीम देखील सहभागी झाली आहे. यात ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष – फारुक मेमन, साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष – इंजि. अशोक पाटोळे, ठाणे जिल्हाध्यक्ष (शहरी) – ॲड. संतोष जानू चव्हाण, भिवंडी तालुकाध्यक्ष – अबू बकर बेरी, भिवंडी तालुका उपाध्यक्ष – प्रवीण सूर्यराव, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा दै.स्वराज्य तोरणचे संपादक- डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील, spts टिव्ही चैनल चे संपादक श्रीनिवास सिरिमले, साप्ताहिक आजचा महाराष्ट्रचे संपादक प्रशांत गणपत मोरे, ठाणे जिल्हा सदस्य – जयदीप आढाईगे, मुरबाड तालुका अध्यक्ष – शाम राऊत, मुरबाड तालुका उपाध्यक्ष – संदीप पष्टे, मुरबाड तालुका कार्याध्यक्ष – अरुण ठाकरे आदींचा समावेश आहे.याशिवाय संपूर्ण भारतातील वृत्तपत्रे, टीव्ही न्यूज, रेडिओ, केबल, शासकीय मीडिया संस्था, जनसंपर्क अधिकारी, जाहिरात संस्था, सायबर मीडिया, दूरसंचार व पोस्ट विभाग तसेच मीडिया शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी या महत्त्वपूर्ण संमेलनात सहभागी झाले आहेत.निसर्ग व अध्यात्माचा संगम असलेल्या माऊंट आबू येथे सहभागी प्रतिनिधींना संमेलनासोबतच पर्यटनाचीही संधी लाभणार आहे. तलाव, धबधबे, बगीचे, डोंगर-दऱ्या, नेत्रदीपक सुर्यास्त दृश्ये तसेच देलवाडा मंदिरे, अचलगढ, गुरुशिखर, आबू अंबाजी, पीसपार्क, ज्ञानसरोवर, पांडवभवन, शांतीवन व ग्लोबल हॉस्पिटल यांसारखी आध्यात्मिक व ऐतिहासिक स्थळे आकर्षण ठरणार आहेत. राष्ट्रीय पत्रकार परिषदेचे उद्घाटन सिने अभिनेत्री डॉ.ईशा अगरवाल यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाले यावेळी जगभरातील हजारो पत्रकार (बंधू-भगिनी) मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]