नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शासनाच्या योजना ७५ हजार नागरिकांपर्यंत पोहोचवणार – आजचा महाराष्ट्र

शासनाच्या योजना ७५ हजार नागरिकांपर्यंत पोहोचवणार

प्रतिनिधी दिलीप करकरे 

माणगावातील शिवसेना आपल्या दारी ‘ लाभ वितरणात विकास गोगावले ग्वाही

रायगड (माणगाव)  :- शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणार असल्याची ग्वाही युवासेना कोणक विभाग राज्य कार्यकारिणी सचिनव विकास गोगावले यांनी येथे बुधवारी दिली.माणगाव येथील शिवसेना आपल्या दारी उपक्रमांतर्गत पात्र नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ वितरण कार्यक्रमात कोकण विभाग सचिव विकास गोगावले बोलत होते. ते पुढे म्हणाले की माणगाव तालुक्यातून आतापर्यंत कोणत्याही आमदाराला पंधरा

हजाराचा लीड दिला नाही ,एवढा लीड मंत्री भरत शेठ गोगावले यांना माणगाव तालुक्याने दिला.त्यांचे ऋण आम्ही कधी विसरणार नाही .शासनाच्या विविध योजना तळागाळातील गोरगरिब जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मंत्री गोगावले सतत प्रयत्न करतात . येत्या ५ वर्षांत ७५ हजार गोरगरिब नागरिक पर्यंत शासनाच्या विविध योजना आम्ही पोहोचवणार आहोत. या वेळी प्रमुख अतिथी विकास गोगावले यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना विविध वस्तू साहित्याचे वाटप करण्यात आले.शिवसेना आपल्या दारी शासनाच्या विविध योजनांचा लाभ १७ सप्टेंबर रोजी १२ वाजता कुणबी भवन माणगाव येथे प्रमुख मार्गदर्शक विकास गोगावले यांच्या हस्ते झाला.या वेळी व्यासपीठावर दक्षिण रायगड युवासेना जिल्हा प्रमुख श्री विपुल जी उभारे , शिवसेना संपर्क प्रमुख श्री. अरुणजी चाळके, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. प्रमोद शेठ घोसाळकर , शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. नीलिमाताई घोसाळकर , युवासेना जिल्हाप्रमुख श्री. विपुल उभारे साहेब , उप जिल्हा प्रमुख श्री रमेश मोरे, युवासेना उप जिल्हाप्रमुख श्री. अविनाश नलावडे, युवासेना समन्वयक महाड विधानसभा श्री. इम्रान भाई पठाण, महाड विधानसभा संपर्क प्रमुख श्री राकेश मोरे शिवसेना तालुका प्रमुख श्री. महेंद्र मानकर , युवासेना तालुका प्रमुख श्री. राजेश कदम, महाड विधानसभा प्रमुख श्री. वैभव मोरे, महिला आघाडी तालुका प्रमुख , शहरं प्रमुख, माणगाव तालुका संर्पक प्रमुख, श्री प्रदास धारिया, युवासेना संपर्क प्रमुख श्री. संतोष पोळेकर,माजी सभापती श्री. महेंद्र शेठ तेटगुरे , श्री. प्रतापशेठ घोसाळकर, श्री. मंगेश सावंत, श्री . मंगेश बटावले, श्री शरीफ भाई हर्णे ,श्री. सुधीरशेठ पवर, शिवसेना – युवासेना -महिला आघाडी -आजी माझी पदाधिकारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]