नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मल्हारपेठ व मारूल हावेली विभागातून आलेल्या गणेश मूर्तींचे कोयना नदी पात्रात केले विसर्जन, – आजचा महाराष्ट्र

मल्हारपेठ व मारूल हावेली विभागातून आलेल्या गणेश मूर्तींचे कोयना नदी पात्रात केले विसर्जन,

प्रतिनिधी शशिकांत माथने 

विभागासाठी सोयीचे ठिकाण म्हणून निसरे -नावडी वसाहत तीरावर मोठी गर्दी 

पाटण (मल्हारपेठ) :– नावडी – निसरे येथील कोयना नदी पात्रात मल्हार पेठ मारूल हवेली संपूर्ण विभागातील घरगुती, व सार्वजनिक गणपतीचे दहा दिवसानंतर सकाळपासून गर्दी करून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले.निसरे – नावडी येथे सकाळपासून सायंकाळपर्यंत कोयना नदी तीरावर दोन्ही बाजूनी घरगुती सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीच्या विसर्जनासाठी आलेल्या वाहनांची गर्दी होती त्यातून गणेश मूर्ती नदी तीरावर घेऊन वाद्याच्या गजरात विधीवत आरतीचा गजर करून काठोकाठ भरलेल्यानदीपात्रात गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन केले . मल्हार पेठ विभागातील वाड्या वस्तीवरील असलेल्या मंद्रुळ हवेली येथील कोयना नदीच्या डोहात विसर्जन केले तर काहींनी सोयीस्कर मार्ग म्हणून निसरे येथील कोयना नदी पात्रात विसर्जनासाठी गिरेवाडी आबदारवाडी निसरेविहीर येथील भाविकांनी विसर्जनासाठी कोयना नदीचा मार्ग निवडला. मारुल हवेली विभागातील कोरीवळे सोनाईचीवाडी, मारुल हवेली, नावडी वसाहत व आसपासच्या गावाने सुद्धा कोयना नदीच्या मोठ्या नदी पात्रात विसर्जनाची गर्दी केली होती. दोन्ही बाजूंनी प्रशस्त रस्ते मार्ग सोय असल्याने व नदी किनाऱ्यावर गणपती विसर्जनासाठी सुलभ सोय असल्याने प्रत्येक वर्षी या ठिकाणी कोयना नदी पात्रात घरगुती गणपती व सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीचे विसर्जन होते. कोयना नदी पात्रात मोठा वाहणारा जलसाठा असल्याने दोन्ही बाजूच्या तीरावर विसर्जनासाठी भाविकांची गर्दी होती ठीक ठिकाणी नैसर्गिक रित्या स्वच्छ व अनुकूल वातावरण आहे. नदीच्या दोन्ही तीरावर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिष्ठानचे अनुयायी निर्माल्य वितरणाची सोय करून उपस्थित होते. याचप्रमाणे मोठमोठ्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीचे विसर्जन मिरवणुकीने, ढोल ताशाच्या बँड पथकाच्या वाद्यात उशिरा सुरुवात होऊन सायंकाळी उशिरापर्यंत याच ठिकाणी विसर्जन करण्यात आले. रात्री उशिरा नदीपात्रात फटाकेच्या आतिश बाजीनी परिसरला होता. प्रति वर्ष प्रमाणे यावर्षी सुद्धा शिस्तबद्ध पद्धतीने नवीन नावढी वसाहत पानवट्यावर शांततेत विसर्जन करण्यात आले

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]