रोहा तालुक्यात शिवसेना शिंदेगटाचीआक्रमकता वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांचा प्रवेश
प्रशांत मोरे
रायगड( रोहा) :- रायगड जिल्ह्यात रोहा तालुका तसा राजकीय दृष्ट्या चर्चेच्या आखाड्याचा केंद्र बनलेला आहे. अनेक वेगवेगळ्या विकास कामांबरोबरच राजकीय मान अपमान. व्यासपीठावर नेत्यांची एकमेकाची टिंगल टवाळी.एकमेकांना आव्हान प्रति आव्हान करण्यामध्ये सत्तेतील राजकीय पक्षातील नेते कोठेच कमी पडत नाहीत हे जणता गमतीने पहातच आहे परंतु या सर्वात रायगडातील शिंदेंची शिवसेनेचे नेते जनतेचे प्रश्न सोडवण्याबरोबरच आपल्या पक्षाचे कार्य सर्वसामान्यांसमोर नेण्यात व संवाद जोडण्यात तत्परता बाळगून त्यांना आपल्या पक्षात प्रवेश करण्यात वरचढ दिसत आहेतत्याचीच एक झलक म्हणजे दिनांक. ८/ ०९/२०२५ रोजी रोहा तालुक्यात धाटाव एम.आय.डी.सी येथील आर आय सी सभागृहात
शिवसेनेची शिंदे गटाची तोफ कॅबिनेट मंत्री सन्माननीय नामदार श्री.भरत शेठ गोगावले अलिबाग मतदारसंघाचे आमदार श्री.महेंद्र शेठ दळवी यांच्या उपस्थितीत तालुक्यातील धाटाव एमआयडीसीचे महत्त्वाच्या अशा समजली जाणारे ग्रामपंचायती रोठ खुर्द, रोठ बुद्रुक येथील आजी माझी ग्रामपंचायत सदस्यांबरोबरच बहुसंख्य ग्रामस्थ तसेच रोहा शहर आंबेवाडी मतदार संघातील कोलाड विभागातील अनेक ग्रामपंचायत मधील नवतरुण कार्यकर्त्यांबरोबर अनेक महिलांनी व जुन्या कार्यकर्त्यांनी जनतेनी मोठ्या थाटामाटात शिवसेनेत प्रवेश केला प्रामुख्याने म्हणजे भारतीय जनता पक्ष वाढवण्यामध्ये ज्या कार्यकर्त्यांनी गेल्या आठ नऊ, वर्ष संघटना वाढवण्यात अतोनात मेहनत घेतली त्या अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश हा भारतीय जनता पक्षाला एक धक्काच आहे गेले दोन वर्ष दबक्या आवाजात भारतीय जनता पक्ष हा हुजरेगिरी तसेच गटातटाचा पक्ष एकाच घरात अनेकांना पदे जुन्या कार्यकर्त्यांची अवहेलना मर्जीतील पदाधिकारी नियुक्ती अशी अवस्था दिसत आहे आणि असे तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकरते चौका चौकात बोलत आहेत तालुक्यात अनेक वर्ष प्रमुख राजकीय पक्षाला विरोध केलेल्या पक्षाचे नेते त्यांच्यातील महायुतीच्यापक्षात सत्तेत सहभागी होताच भारतीय जनता पक्षाच्या कार्य कार्यत्यांची ना घर का ना घाट का अशी अवस्था झालेली दिसत आहे आपल्या उत्तुंग अपेक्षेचे ओझे बाळगताना सन्माननीय भरत शेठ गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांनी व्यासपीठावरील संभाषणाबरोबरच संघटना वाढीसाठी रोहा तालुक्यातील राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या ग्रामपंचायती बरोबरच एमआयडीसी मध्ये प्रवेशाचा सोहळा पार पाडून भविष्यातली रणनीती आखल्याचे दिसत आहे त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यातील स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका यांच्यातील खरी लढत पाहायला मिळेल यात शंका नाही तालुक्यातील भाजप पक्षातील जिल्ह्यातील काही वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा सन्माननीय राष्ट्रवादी नेत्यांशी पडद्यामागील संबंध असल्यामुळे पक्षातील छोटे कार्यकर्ते राष्ट्रवादीशी संघर्षात येतील की नाही शंकाच जनतेच्या मनात आहे रोहा तालुक्यातील पेन मतदार संघात येणाऱ्या भागाचे असणारे भाजपाचे आमदार यांची गेल्या वेळीची आणि यावेळची कारकीर्द पाहता भाजपचा कार्यकर्ता हरवलेला दिसत आहे आणि राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते नेते विकासाची कामाची पत्र त्यांच्याकडून आणताना दिसत आहेत त्या मुळे याची निवडणुकीत राजकीय संघर्ष पाहावयास मिळाला तर तो रोहा तालुक्यातील श्रीवर्धन व अलिबाग विधानसभा मतदारसंघात जोडलेल्या भागातच पाहायला मिळेल त्यात कोणती शंका नाही आजच्या प्रवेश सोहळ्यात अनेक ज्येष्ठ नागरिक युवा कार्यकर्ते तसेच महिला वर्गांचा प्रवेश शिवसेना जिल्हाध्यक्ष, शिवसेना तालुकाप्रमुख नामदार भरत शेठ गोगावले आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या उपस्थितीत व्यासपीठावरील संघर्षाचे शाब्दिक चकमक पाहायला मिळाली त्यामुळे राजकीय संघर्षाला भविष्यात चांगलीच धार मिळणार नक्की आणि शिवसेनेला नव संजीवनी मिळण्याचे संकेत दिसत आहेत.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













