नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सुखकर्ता’वर काॅंग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष! – आजचा महाराष्ट्र

सुखकर्ता’वर काॅंग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष!

प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे 

महेंद्रशेठ घरत यांच्या चार वर्षांच्या उत्तम कामगिरीचे सेलिब्रेशन!

रायगड (उरण) :- काँग्रेसचे एकनिष्ठ, कट्टर,प्रामाणिक नेते म्हणून सुपरिचित असलेले महेंद्रशेठ घरत यांच्या रायगड जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड होऊन चार वर्षे झाली. त्याबद्दल जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या काॅंग्रेसच्या चार वर्षांच्या उत्तम कामगिरीबद्दल जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी ‘सुखकर्ता’ बंगला येथे सेलिब्रेशन करून जल्लोष साजरा केला. यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, ”सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिलेली चांगली साथ माझ्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळेच काॅंग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून गेल्या चार वर्षांत चांगले काम करता आले. अलिबाग सारख्या ठिकाणी युवकांसाठी शिबिर घेण्यात आले. ते युवकांसाठी दिशादर्शक ठरले राज्यात ते रोलमाॅडेल ठरतेय. आगामी काळात काॅंग्रेसचेच दिवस

येतील, असा मला विश्वास आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये.”यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मार्तंड नाखवा, विनोद म्हात्रे, महादेव कटेकर, हेमराज म्हात्रे, किरीट पाटील,वैभव पाटील, मिलिंद कांदळगावकर, रेखा घरत,निर्मला पाटील, विनया पाटील, हेमंत ठाकूर, आदित्य घरत,लंकेश ठाकूर, अजित ठाकूर, तसेच असंख्य कॉंग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]