नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिक्षिका सुजाता मालोरे यांना रायगड जिल्हा आदर्श शिक्षका पुरस्कार जाहीर – आजचा महाराष्ट्र

शिक्षिका सुजाता मालोरे यांना रायगड जिल्हा आदर्श शिक्षका पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी पांडुरंग माने

रायगड(माणगाव) :- शिक्षक हे समाजाचे आरसे असतात. ते विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक दृष्टिकोन विकसित करतात आणि त्यांना जबाबदार नागरिक बनवतात. सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी केलेले कार्य हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. शिक्षक समाजातील सकारात्मक बदल घडवून आणणारे एक साधन बनतात. ते विद्यार्थ्यांमध्ये समानता, न्याय आणि बंधुभावना या मूल्यांचे बीजारोपण करतात. असे शिक्षकच आहेत जे भविष्यातील डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ आणि नेते घडवतात. आदर्श शिक्षक पुरस्कार हा या सामाजिक योगदानाला मिळणारा सर्वोच्च सन्मान आहे.रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत देण्यात

येणारे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. २०२५/२६ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हाभरातील १७ शिक्षकांची निवड आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी करण्यात आली असल्याची माहिती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व प्राथमिक शिक्षण अधिकारी ललिता दहितुले यांनी दिली आहे.भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा ५ सप्टेंबर हा जन्म दिवस दरवर्षी शिक्षक दीन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. जिल्ह्यातील १७ शिक्षकांची निवड आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.त्यामध्ये माणगांव तालुक्यातील न्हावे गावच्या शिक्षिका श्री संतोष मालोरे गुरुजी यांच्या सौभाग्यवती सौ सुजाता संतोष मालोरे यांची रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे त्यांनी विध्यार्थी आणि शाळा यांच्या करता दिलेले योगदान सर्वकाही सांगून जाते मागील अनेक वर्षे सातत्याने मालोरे बाईंनी आपल्या शाळेत शाळा विकास आणि विद्यार्थी गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांनी आपल्या नोकरीच्या सेवेत विद्यार्थी गुणवत्ता विकास आणि पालक व समाज सहभाग यांच्या माध्यमातून व आपल्या सहकारी शिक्षकांच्या सहकार्याने शाळा आदर्श बनविल्या आहेत. त्यासोबतच मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक क्षेत्रात उठाव करत शाळेच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून घेतल्या आहेत. त्यातून ऑफलाईन आणि ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न करत असतात. विविध स्पर्धा, वाचन – लेखन उपक्रम, स्पर्धा परीक्षा, आपत्कालीन काळातील सेवा, ग्रामीण व शहरी भागातील प्रबोधन, विविध शासकीय योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी घेतलेला पुढाकार, विद्यार्थ्यांसोबतच स्वतःची शैक्षणिक पात्रता वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न, साक्षरता अभियानातील सहभाग, पर्यावरण संरक्षण आणि वृक्षसंवर्धन, विविध स्पर्धामधील विद्यार्थी सहभाग, त्यांच यश या सर्व बाबीचा विचार करून जिल्हास्तरीय निवड समितीने त्यांची आदर्श शिक्षिका म्हणून निवड करण्यात आली आहे त्यांचावर सर्व क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे शैक्षणिक सामाजिक कार्याची नेहमीच दखल घेणाऱ्या कुणबी युवा मंचा कडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]