नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिवसेना उरण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा तर्फे आयोजित मोफत आरोग्य शिबिरास उरणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – आजचा महाराष्ट्र

शिवसेना उरण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा तर्फे आयोजित मोफत आरोग्य शिबिरास उरणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे

रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची प्रमुख उपस्थिती

रायगड (उरण) :- दि.३ शिवसेना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, उरण तर्फे दरवर्षी बाझारपेठ गणपती चौकात गणेशोत्सव साजरा होता. दरवर्षी विविध सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रम गणेशोत्सव काळात राबविले जातात यंदाही शिवसेना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ उरण यांच्या वतीने बुधवार दिनांक ०३ सप्टेंबर २०२५ रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण शहर शाखेजवळ अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई व जयश्री फाउंडेशन यांच्या सौजन्याने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते,

या शिबिरामध्ये बी.पी चेक, शुगर चेक , वजन चेक, रक्तदाब तपासणी, शरीर द्रव्य निर्देशांक (BMI), हाड घनता तपासणी, तसेच सर्व रुग्णांना शिबिरात तज्ञ् डॉक्टरांकडून सल्ला देण्यात आला.या शिबिरामध्ये १३० नागरिकांनी लाभ घेतला.या शिबिराचा आयोजन केल्याबद्दल नागरिकांनी, भाविक भक्तांनी श्री गणेशोत्सव मंडळाचे व शिवसेनेचे आभार मानले आहेत. या शिबिरास शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, शहर संपर्क संघटिका श्रीमती वंदना पवार, माजी शहर संघटक प्रवीण मुकादम, शाखाप्रमुख अविनाश म्हात्रे, शिवा म्हात्रे व कार्यकर्ते उपस्थित होते, सदर आरोग्य शिबिराच्या आयोजन शिवसेना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संदेश पाटील, सुशांत तांडेल, संजय मेश्राम, फतेह खान, रोनित पाटील, यश मढवी व कार्यकर्ते यांनी केले होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]