ब्रम्हाकुमारीज कडून मुरबाडमध्ये दिव्य अलौकिक सन्मान सोहळा आणि संत समागम..
प्रतिनिधी
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, द्वादश ज्योतिर्लिंग दर्शन Spiritual SpARC Exhibition व आरोग्य शिबिराचा नागरिकांना लाभ
ठाणे (मुरबाड) :– टाकेश्वर मठाधिपती परमपूज्य योगी फुलनाथजी महाराज यांची नुकतीच राष्ट्रीय धर्मगुरुपदी निवड झाल्याने प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय संस्थेच्या वतीने मुरबाडमध्ये एक भव्य दिव्य सन्मान सोहळा आणि संत समागमाचे आयोजन करण्यात आले. माऊली हॉलमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यात 
उपस्थित संत-महंतांच्या पावन उपस्थितीत हजारो भाविकांनी सहकुटुंब दर्शनाचा लाभ घेतला.आजारीपणामुळे योगी फुलनाथजी महाराज प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या वतीने योगी गोपीनाथ महाराज यांना राजयोगिनी ब्र. कु. अलका दीदीजी यांच्या हस्ते दिव्य सन्मान प्रदान करण्यात आला. या वेळी अलका दीदीजी यांनी परमात्म अवतरणाचा संदेश देऊन जीवनाच्या उच्च धेया पयँत
पोहचण्यासाठी श्री कृष्ण जन्माष्टमीच रहस्य पाठवुन सांगितलं व सकारात्मक वृत्ति ने समाजाला परिवर्तन करण्याचा मुल मंत्र दिला तसेच ब्र कु पुनम दीदी यांनी संस्था परिचय देऊन मनाला शान्ति देणारी खुप छान अशी मेडिटेशन अनुभूति सर्वांंना दिली.मान्यवर संत आणि प्रमुख उपस्थिती या सोहळ्याचे मुख्य अतिथी राजयोगिनी ब्र.कु. अलका दीदीजी (संचालिका, ब्रम्हाकुमारीज कल्याण सबझोन व SPARC विंग महाराष्ट्र प्रभारी), ह.भ.प. अर्जुन सरजिणे, योगी गोपीनाथ महाराज (संगमेश्वर मठाधिपती), तर विशेष अतिथी म्हणून योगी स्वामी महाराज (पंचमुखी हनुमान मठ, डोळेपाडा), आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मानव सेवा संस्थेचे अध्यक्ष सुरेश बांगर, वारकरी व नाथ संप्रदाय प्रमुख रामभाऊ दळवी, नगरसेविका मधुराताई मोहन सासे, मा. नगराध्यक्षा छायाताई चौधरी, सरपंच रेश्माताई घरत, भाजपा कार्यकर्ते नरेश मोरे, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.उपक्रमांचा समावेश या दिव्य सोहळ्यात विविध उपक्रमांद्वारे सामाजिक व अध्यात्मिक मूल्यांचा संगम अनुभवायला मिळाला :

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार :– शालांत परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा संतांच्या हस्ते गौरव. तसेच लेफ्टनंट शामिली विजय जाधव व डाॅ प्रियंका संजय बोरगे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.द्वादश ज्योतिर्लिंग दर्शन – श्रावण महिन्यात भाविकांना पवित्र दर्शनाचा लाभ.
आरोग्य उपक्रम – नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी व रक्त तपासणी शिबिर. असंख्य नागरिकांनी यात सहभाग घेतला.ब्र. कु. अलका दीदीजी व वैशाली दीदी यांच्या सोबत मेघा दिदी, उषा दीदी, पुनम दीदी, रेणुका दीदी, प्रियेशा दीदी, नियोजन कौतुकास्पद या सर्व उपक्रमांचे अत्यंत आकर्षक आणि शिस्तबद्ध नियोजन ब्र. कु. वैशाली दीदी (संचालिका – ब्रह्माकुमारीज स्नेही परिवार सेवा केंद्र, मुरबाड) यांनी केले. संतोष (माऊली) चौधरी यांनी माऊली गार्डन हाॅल सेवेसाठी उपलब्ध करुन दिला. कृष्णकांत तुपे यांच्या कडून विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देण्यात आले. तसेच रविन्द्र घोलप, संतोष खंडागळे, राम कराळे, चन्द्रकांत गायकर, शाम कराळे, अनिष मिश्रा, लता गायकर, सुवर्णा गायकर, त्यांनी या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.व यावेळी सूत्रसंचालन करून राजू गोडांबे व ब्र कु राणी दीदी यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
निष्कर्ष :- ओम शांतीच्या वातावरणात पार पडलेला हा सोहळा समाजाला एक सकारात्मक दिशा देणारा, संतांचा आशीर्वाद, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, आरोग्य सेवा आणि भाविक भक्तांचा मोठा सहभाग यामुळे मुरबाडच्या आध्यात्मिक व सामाजिक इतिहासातील संस्मरणीय पर्व ठरला.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













