गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्हां बाळा ” ” तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा ” अशा नटखट आरोळ्याने आसमंत दुमदुमून जाते!
प्रतिनीधी सतिश पाटील
मुंबई :- दहीहंडी धार्मिक सण उत्सव साजरे व्हावे पण गालबोट न लागता ! थोडक्यात श्री कृष्णाने जन्म गोकुळ नगरीत झाला गोकुळात त्या काळी भरपुर गाई असत साहजिकच दुध ,दही भरपूर प्रमाणात असे , श्री कृष्णाच्या खोड्या कोणाला माहित नाहीत, “यशोदा मैय्या ये तेरा कन्हैया ” अशा भरपूर खोड्या काढण्यात हुशार असाच प्रकारे आपल्या संवगड्याना दुध,दुध खावून आपले आनंद घेत . खुप थर नाही तर पुर्वी दुध ,दही ,लोणी उंचीवरून ठेवण्यात येत सुरक्षित म्हणून मुंग्या व इतर प्राण्यांपासून वाचण्यासाठी मडक्यात रस्सीने बांधून कारण तेव्हा आता सारखे तंत्रज्ञान विकसित नव्हते चार संवगडी घेऊन एखाद थरावरील दुध ,दही काढून वाटून खात असत.श्रीकृष्णाच्या या नटखट कृत्याला “माखण चोर “असे बोलले जात असे तीच आजची दहीहंडी उत्सव 
म्हणून आजही अनेक काळापासून रित चालत आहे.तीच आजची प्रथा :दहीहंडी हा एक हिंदू सांस्कृतिक श्रीकृष्ण जन्मोत्सव पारंपारिक धार्मिक उत्सव साजरा होत होता ! आता तो चढाओढीचा राजकीय मनोरंजन आणि स्टेटस चा विषय बनला आहे ! किती मृत्यू आणि हातपाय मोडून दुखापतग्रस्त असतात कधी तर कायम पांगळे ,अपंगत्व ही पत्करावे लागते का आपला जीव धोक्यात घालून जीवनाचे वाटोळे करून बसतात, दहीहंडी उत्सव करू नये असे नाही पण सेफ्टी जरूरी आहे जमीवर आता काँक्रिट असते कठीणच पुर्वी माती वा डांबर असायचे आता सेफ्टी मॅट असूनही अपघात होतात. आयोजक आपली पोळी या उत्सवानिमित्त भाजून घेतात प्रचार अगदी जोरदार होतो. भरपूर पब्लिक जमा करून येते अफाट खर्च पण का त्या गोविंदाच्या जीवनाचा विचार करून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत कदाचित मदत होईल लाखोची पण मानव जन्म एकदाच बाबा करोडो खर्च केला तरीपण पुन्हा जीवंत मिळू शकत नाही याचे कारण काॅम्पिटीशन चे युग यासर्व अपघातातून वाचण्यासाठी काय उपाय योजना राबविण्यात येईल याचा गांभिर्याने विचार करून तोडगा काढण्यात यावा जेणे करून उत्सव ही साजरा होईल आणि दुखापत, दुर्दैवी अपघात ही होवू नये ! एक तर दहीहंडी ही चढाओढ न ठेवता कमीत कमी उंचीवर ठेवण्यात यावी आयोजकांनी सर्व जबाबदारी स्वीकारावी कोणी असो मॅनपावर उभे करावे गोविंदा थरारून पडला तर झेलता यावे फक्त बघ्याची भुमिका नको ! दुसरे गोविंदा पथक हे देखील तेवढेच जबाबदार राहतील आपल्या पथकाचे नाव मोठे करण्यासाठी जो आटापिटा करता तसाच गोविंदाला ही काही इजा होऊ नये याची काळजी घेण्यात यावी.तो ही कोणाचा मुलगा,भाऊ आहे ना काय दुख्खाचा डोंगर कोसळत असेल त्या मातेला जेव्हा आपला मुलगा थरावरून पडून मृत्यू झाला.दहीहंडी नंतर सर्व हाॅस्पिटल फुल असतात अनेक गोविंदा ला गंभीर दुखापत झालेली असते हे सर्व टाळता येईल का ?पैसा आणि नाव महत्त्वपूर्ण नाही तर जीवन महत्त्वपूर्ण आहे बघा काही सुधारणा होते का ज्याने या धार्मिक उत्सवाला गालबोट लागणार नाही!
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













