कणकिया पोलीस ठाण्याचे पी.एस.आय प्रमोद महिपती पाटील यांना पदोन्नती
प्रतिनिधी ललित दवे
मुंबई :- मीरा- भाईंदर, वसई – विरार पोलीस पोलीस आयुक्तालयातील मिरारोड / कणकिया पोलीस ठाण्याचे पीएसआय अधिकारी प्रमोद महिपती पाटील यांना पोलीस उप- निरीक्षक ते सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली. प्रमोद पाटील हे मीरा रोड येथील कणकिया पोलीस ठाण्यात पोलीस उप- निरीक्षक म्हणून कार्यरत होते, त्यांच्या कामाची आणि सेवांची दखल घेत महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना पदोन्नती देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षकाची जबाबदारी दिली. पदोन्नतीनंतर मीरा भाईंदरमधील 
त्यांच्या ओळखीच्या आणि सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांसह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांचे मित्र, कुटुंब आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर त्यांच्या बेव्हरली पार्क पोलीस चौकीत त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आले. आपल्या भावना व्यक्त करताना प्रमोद पाटील म्हणाले की, महाराष्ट्र पोलिसांनी माझ्या कामाचे कौतुक केल्याबद्दल आणि नागरी सेवेसाठी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे बजावल्याबद्दल पदोन्नतीद्वारे माझा सन्मान केला आहे. प्रमोद पाटील यांनी त्यांचे आभार मानले आणि अभिनंदन करण्यासाठी आलेल्या सर्व कुटुंब, मित्र आणि सहकाऱ्यांचे आभार मानले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













