नवेदर नवगाव श्री बोरेश्वराची पालखी मिरवणूक
प्रतिनिधी सचिन पावशे
रायगड (अलिबाग) :- नवेदर नवगाव बोरेश्वर मंदिरात दिनांक २८ जुलै रोजी सप्ताहाला सुरुवात झाली होती. श्रावणी सोमवारच्या दुसऱ्या सोमवारी दिनांक ४ ऑगस्ट रोजी नवेदर नवगाव येथे श्री. बोरेश्वराची पालखी मिरवणूक सकाळी आठ वाजता निघाली . बोरेश्वर मंदिरात पालखी सोहळ्यानिमित्त पहाटेपासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. हर हर महादेव, शिवशंभु चा गजर, टाळ मृदुंगाचा गजर, गुलालाची उधळण अशा थाटात नवेदर नवगाव येथील श्री बोरेश्वर महाराजांची पालखी निघाली.नवेदर नवगव बोरेश्वर मंदिर हे एक ऐतिहासिक मंदिर आहे.श्री.बोरेश्वर मंदिरात वर्षभर 
सायंकाळी सात वाजता आरती होत असते.बोरेश्वर मंदिर हे नवसाला पावणारे मंदिर आहे. बोरेश्वर मंदिरात आपले नवस फेडण्यासाठी सात दिवस बोरेश्वर मंदिरात उपासना करत असतात .नवस फेडण्यासाठी मंदिरात स्त्री व पुरुष असतात .श्रावणी सोमवारच्या दुसऱ्या सोमवारी पालखी पालखी सोबत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती .पालखी सोबत तीन बँड पथक होते. चित्ताकर्षक श्री. बोरेश्वर ब्रास बँड पथक नवगाव, कर्ण मधुर ज्योती ब्रास बँड नवगाव, श्री गुरुदत्त ब्रास बँड पथक नवगाव .तीन बँड पथकांची जुगलबंदी पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. पालखी सोहळ्याला अलिबाग तालुक्यातील भाविक मोठ्या प्रमाणात दिसून येतात. पालकी सोबत गावातील सहा भजनी मंडले व तीन बँक पथक सोबत होते. बँड पथकामध्ये मुलींचा सुद्धा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. श्रावणी सोमवारच्या दुसऱ्या सोमवारी बोरेश्वर मंदिरातून पालखी निघाली होती. ही पालखी संपूर्ण गावात फिरवली जाते त्यानंतर दुपारी तीन वाजता पुन्हा पालखी बोरेश्वर मंदिरात आणली गेली. त्यानंतर नेहमीप्रमाणे बोरेश्वरच्या मंदिरात आरती झाली .अशा प्रकारे श्री बोरेश्वर मंदिरात पालखी सोहळा संपन्न झाला.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













