नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , प्रताप सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी नवनाथ सुतार, विनायक खैरमोडे उपाध्यक्ष – आजचा महाराष्ट्र

प्रताप सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी नवनाथ सुतार, विनायक खैरमोडे उपाध्यक्ष

प्रतिनिधी शशिकांत माथने

पाटण :- दि. २ : दरवर्षीप्रमाणे येथील प्रताप सेवा मंडळाची नूतन पदाधिकारी निवड बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत चालू वर्षाकरीता मंडळाच्या अध्यक्षपदी नवनाथ सुतार यांची तर उपाध्यक्षपदी विनायक खैरमोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. खजिनदारपदी अमोल खैरमोडे, सहखजिनदार संकेत खैरमोडे व अभिषेक घोणे, सचिवपदी हेमंत खैरमोडे, सहसचिवपदी चेतन गायकवाड यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या.१९६४ साली स्थापन करण्यात आलेल्या प्रताप सेवा मंडळामार्फत आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्याचबरोबर मंडळाने आजपर्यंत स्त्री भ्रूणहत्या, सामाजिक समस्या, ग्रामस्वच्छता अभियान अशा प्रकारे समाज जागृती करणारे जीवंत देखावे सादर केले आहेत. या मंडळामध्ये सर्व जातीधर्माचे लोक एकत्रित येवून गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहात साजरा करतात हे या मंडळाचे खास वैशिष्ट्य आहे. यावर्षीचा गणेशोत्सव विविध सामाजिक उपक्रमांनी व शांततेत साजरा करण्याचे बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले.यावेळी सन २०२४/२०२५ या वर्षासाठी मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार आदी पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सभासद यांच्या उपस्थितीत मंडळाच्या सन २०२३-२४ या गत वर्षीचा आर्थिक हिशोब समोर मांडण्यात आला. त्याची सर्व जेष्ठ सदस्यांनी पाहणी करून कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले व त्यास सर्वानुमते संमती देण्यात आली. तसेच चालुवर्षी देखील गणपती उत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याबाबत चर्चा झाली. याप्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.बैठकीच्या प्रारंभी मंडळाच्या दिवंगत सदस्यांना मंडळाच्यावतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. राहूल मुळे यांनी स्वागत केले. बैठकीस मंडळाचे ज्येष्ठ सदस्य दिगंबर खैरमोडे, आप्पा मगरे, जितेंद्र सूर्यवंशी, हेमंत खैरमोडे आर्दीसह मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]