कमळ पतसंस्थेतर्फे मधुमेहापासून मुक्ती मार्गदर्शन शिबीर
प्रतिनिधी ता सचिन पावशे
रायगड (अलिबाग) :- कमळ नागरी सहकारी पतसंस्था व डॉ. अरविंद केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने १० ऑगस्ट रोजी अलिबा येथे मधुमेहापासून मुक्ती यावर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. भाग्यलक्ष्मी हॉल अलिबाग येथे सकाळी १०.३० ते दुपारी २.०० या वेळेत योजला आहे. हे शिबीर होणार आहे. पुणे येथील मधुमेह तज्ज्ञ डॉ. भाग्येश कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला जोडून अलिबाग मधील प्रतिथयश प्रोपॅथ लॅब च्या डॉ. सौ. अपूर्वा कुमठेकर यांच्या सौजन्याने अत्यल्प शुल्कामध्ये रक्त तपासणी होणार आहे. या एकूण कार्यक्रमाचे शुल्क केवळ ३०० रूपये आहे. शिबिरासाठी आत्तापर्यंत ४०० जणांनी नोंदणी केली आहे. या शिबिरासाठी ५ ऑगस्टपूर्वी रक्त तपासणी करणे आवश्यक आहे. मधुमेहापासून मुक्ती मार्गदर्शन शिबिराचा लाभ जास्तीतजास्त लोकांनी घ्यावा असे आवाहन कमळ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन नंदकुमार चाळके व डॉ. अरविंद केळकर यांनी केले आहे.सामाजिक बांधिलकीचे तत्व अंगिकारून कमळ नागरी सहकारी पतसंस्था आपली वाटचाल गेली ३३ वर्षापासून करीत आहे. सध्या या पतसंस्थेचे सुमारे ४२००० सभासद असून ८४३ कोटी रुपये एकत्रित व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे. कमल पतसंस्था केवळ नफा मिळविणे हेच उद्दिष्ट न ठेवता सहयोग गोशाळा, सतिश धारप डायलिसिस सेंटर, कमळ वाचनालय, कमळ पोळीभाजी केंद्र, सहकार दर्शन सारखे सहकारास वाहिलेले एक पाक्षिक हे उपक्रम राबविण्यात मदत करत असते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













